ठाकरे बंधूंचं 'अब की बार ७५ पार', ठाणे महापालिकेसाठी रणशिंग फुंकले, बड्या खासदाराने दिले संकेत
Saam TV October 18, 2025 06:45 PM
  • ठाणे महापालिका निवडणूक ठाकरे बंधू एकत्र लढणार.

  • ठाकरे बंधू सबपे भारी

  • संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. प्रत्येक पक्षाने रणशिंग फुंकले आहेत. मुंबईसह ठाण्यातही राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. राज्यातील राजकारणात सध्या ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार का? व्यासपीठावर जरी एकत्र आले तरीही, दोघांमध्ये राजकीय युती होणार का? हा प्रश्न सतत उपस्थित होत आहे. दरम्यान, ठाणे महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार, अशी थेट घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीबाबत संजय राऊत म्हणाले, 'ठाणे महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. ठाण्यात ठाकरे बंधू हे ठिकऱ्या उडवतील', असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. 'दोन भाऊ एकत्र निवडणूक लढवतील. तेव्हा त्यांची ताकद दिसेल. दोन्ही भावांचं अबकी बार ७५ पार आहे', असं म्हणत संजय राऊतांनी भाजपच्या 'अब की बार ७० पारला' प्रत्युत्तर दिलं आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील ठाकरे गटाचा बडा नेता भाजपच्या वाटेवर, पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, 'ठाण्यात आम्ही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र निवडणूक लढवणार आहोत. तसेच सत्तेवर येणार आहोत. आमचा नारा हा ७५ पारचा आहे. ते जे काही म्हणतील, त्याच्यापेक्षा जास्त ५ आम्ही सांगू. दोन ठाकरे सबपे भारी होणार आहेत. दोन ठाकरे सगळ्यांच्या ठिकऱ्या करतील. जेव्हा दोन्ही भाऊ एकत्र येतील, तेव्हा आमची ताकद सर्वांनाच दिसेल', असं संजय राऊत म्हणाले.

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

सध्या सर्वत्र ठाकरे बंधूंची राजकीय युती कधी होईल? अधिकृतरित्या युतीची घोषणा कधी होईल? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. मराठी भाषा अस्मितेसाठी एकाच व्यासपीठावर एकत्र आल्यानंतर दोन्ही बंधू बऱ्याचवेळी एकत्र दिसले. मात्र, अद्याप त्यांनी राजकीय युतीची घोषणा केली नाही. खासदार संजय राऊतांनी ठाणे महापालिकेच्या निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा केली. राऊत यांनी केलेल्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेना ठाकरे गटाची दिवाळी जोरात; इनकमिंग सुरूच, बड्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.