Akola News: हरियानाच्या गोलंदाजांचा गोंधळ – फैज आणि बिष्टने खेळवला शतकांचा फटाकाहरियाना हवालदिल
esakal October 18, 2025 11:45 PM

नागपूर: वेदांत दिघाडेपाठोपाठ कर्णधार महंमद फैज व वरुण बिष्टने झळकाविलेल्या शतकांच्या जोरावर विदर्भाने २३ वर्षांखालील मुलांच्या कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात सर्वबाद ५३६ अशी विशाल धावसंख्या उभारली. या धावसंख्येला सामोरे जाताना हरियानाची ४ बाद ८० अशी नाजूक स्थिती आहे.

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर सुरू असलेल्या चारदिवसीय सामन्यात ३ बाद २५३ वरून विदर्भाने अपेक्षेप्रमाणे पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली. शतकवीर फैजने ११ चौकारांसह २०९ चेंडूत ११ चौकारासह १४३ धावा केल्या.

IND vs WI, 2nd Test: वेस्ट इंडिजचं कौतुक करायला हवं... फॉलोऑननंतरही भारतासमोर उभं केलं आव्हान; शुभमन गिलच्या संघाच्या टप्प्यात विजय

तर वरुणने १६ चौकार व एका षटकारासह १५० चेंडूंत १२१ धावा काढल्या. दोघांनी पाचव्या गड्यासाठी २०१ धावा जोडल्या. याशिवाय संस्कार चावटेने ३३ व गौरव फारदेने १९ धावांचे योगदान दिले.

हरियानाकडून राहुल राठीने सर्वाधिक चार गडी बाद केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हरियानाची ४ बाद ८० अशी स्थिती होती. हितेश बोरा २१ व दिनेश बाना १९ धावांवर नाबाद आहेत. विदर्भाकडून गौरव फारदेने दोन गडी बाद केले.

IND vs WI 2nd Test Live: शुभमन गिल १२९ धावांवर नाबाद, तरीही टीम इंडियाने डाव घोषित केला! यशस्वी जैस्वालचे द्विशतक हुकल्याची सल...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.