Dhanteras shopping mistakes: आज देशभरात धनत्रयोदशी साजरी केली जात आहे. आजपासून दिवाळी सणाला सुरूवात झालीय. दिवाळी हा सण पाच दिवस साजरा केली जातो. हा सण आनंद आणि सुख समृद्धी घेऊन येतो. तसेच धनत्रयोदशीला त्रयोदशी असेही म्हणतात. या दिवशी खरेदी करणे शुभ मानलं जाते. पण आज शनिवार आल्याने काही वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते.
धनत्रयोदशीला काही खास खरेदी करण्याची प्रथा आहे. माता लक्ष्मीशी संबंधित वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. माता लक्ष्मीशी संबंधित वस्तूंमध्ये कवच, कमळाचे बीज, धणे, गोमती चक्र, हळदीचे गोळे, झाडू आणि सोने आणि चांदी यांचा समावेश आहे. धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी कराव्यात. पण आज पुढील वस्तू खरेदी करू नका असे शास्त्रानुसार सांगण्यात आले आहे.
झाडू आणि मोहरीचे तेल खरेदी करणे
एक झाडू आहे आणि दुसरे मोहरीचे तेल आहे. शनिवारी दोन्ही खरेदी करणे अशुभ मानले जाते. धनत्रयोदशी शनिवारी असल्याने, गरज असली तरी आज ते खरेदी करणे टाळा. रविवारी दुपारच्या आधी झाडू आणि मोहरीचे तेल खरेदी करा. त्रयोदशी तिथी आज, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२:१८ वाजता सुरू होते आणि १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १:५१ वाजता संपते. म्हणून, काही वस्तू उद्या, रविवारी खरेदी करता येतील. धनत्रयोदशीला प्रदोष काळ देखील महत्त्वाचा असतो, म्हणून झाडू आणि मोहरीचे तेल वगळून आजच तुमची मुख्य खरेदी पूर्ण करा.
झाडू हा घरातील स्वच्छता आणि समृद्धीशी संबंधित आहे. म्हणूनच, योग्य वेळी तो खरेदी करणे आणि वापरणे घरात आनंद आणि संपत्ती आणते असं मानलं जातं. झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं आणि चुकीच्या दिवशी तो खरेदी केल्याने आनंद, समृद्धी आणि भाग्याची माता लक्ष्मी नाराज होऊ शकते.
शुभ मुहूर्तावर झाडू खरेदी केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. ज्योतिषशास्त्रानुसार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी झाडू खरेदी करणे सर्वात शुभ मानलं जातं. या दिवशी झाडू खरेदी केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करते. यामुळे केवळ आर्थिक समृद्धीच येत नाही तर घरात आनंद, शांती आणि आरोग्य देखील येते. याव्यतिरिक्त, झाडूचा योग्य वापर केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शुद्ध आणि सकारात्मक वातावरण राखले जाते.
Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोनं किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल, तर 'हे' स्वस्त उपाय केल्यास होईल धनप्राप्ती अन् माता लक्ष्मी होईल प्रसन्नत्याचप्रमाणे शनिवारी मोहरीचे तेल खरेदी करण्यास मनाई आहे. मोहरीचे तेल हे शनीचे प्रतीक आहे आणि या दिवशी तेल खरेदी केले जात नाही तर दान केले जाते. दिवाळीत दिव्यांना लावण्यासाठी मोहरीचे तेल आवश्यक आहे, म्हणून शनिवारी ते खरेदी करणे टाळा.
आज शनि प्रदोष व्रत
धनत्रयोदशीसह आज शनि प्रदोष व्रत देखील आहे. म्हणून, आज संध्याकाळी शनिदेवाला दिवा लावा आणि तो अर्पण करा. शनि दोषाचा प्रभाव कमी काळे तीळ, लोखंडी वस्तू अर्पण कराव्या. जर तुम्ही कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल तर तुम्हाला आरोग्य लाभ आणि कर्जातूनही मुक्तता मिळेल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.