दिवाळीचा सण आता जवळ येत आहे आणि यानिमित्ताने बाजारात प्रचंड गर्दी आहे. लोक मिठाईपासून ते दिवे-पणत्या आणि नवीन-नवीन कपडे खरेदी करण्यात गुंतले आहेत. अगदी मॉल्ससुद्धा लोकांनी भरलेले आहेत. अशा परिस्थितीत जरा विचार करा, जर मॉलच्या आत एखादा जंगली प्राणी घुसला तर? होय, सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक बिबट्या मॉलच्या आत धावताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत आणि विचार करत आहे की, बिबट्या मॉलमध्ये शिरला कसा?
व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य काय?
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की बिबट्या मॉलमध्ये इकडून तिकडून पळत आहे. पळताना गुळगुळीत फरशीवर घसरत आहे, कचरापेट्यांना धडकत आहे आणि अगदी एस्केलेटरवरही चडताना अडखळताना दिसत आहे. असं वाटतंय जणू जंगली प्राण्यांनीही सणासुदीच्या खरेदीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बिबट्याला मॉलमध्ये पळताना पाहून लोकही घाबरलेले दिसत आहेत आणि इकडे-तिकडे पळण्याचा प्रयत्न करत आहेत. आता काहींना हा व्हिडीओ खरा वाटला तरी, प्रत्यक्षात हा एक एआय व्हिडीओ आहे, जो केवळ मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे. हा व्हिडीओ सत्य घटनेवर आधारीत नाही.
वाचा: 6 वर्षे फिरत होता फेक IAS बनून, 150 लोकांकडून लुटले 80 कोटी… मग कायद्याने…
View this post on Instagram
A post shared by AI Filmmaker (@aikalaakari)
तुफान व्हायरल
हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर aikalaakari या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 16 मिलियन म्हणजेच 1.6 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 63 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाइक केले आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
व्हिडीओ पाहून कोणी मजेशीर अंदाजात लिहिलं, ‘तो तर प्यूमाचा एरिया सेल्स मॅनेजर आहे. सेल्स टीमला भेटायला आला होता’, तर कोणी विचारलं, ‘याची सिक्युरिटी तपासणी कोणी केली?’. एका युजरने लिहिलं, ‘भयंकर एआय…किमान लोकांना पळू दे, बिबट्याला धडकू देऊ नका’, तर दुसऱ्याने लिहिलं, ‘शॉपिंग करायला आला आहे’. त्याचप्रमाणे एका युजरने लिहिलं, ‘एआय हाताबाहेर जात आहे आणि हे तर फक्त 2025 आहे’, तर काहींनी मजेशीर अंदाजात लिहिलं, ‘उद्या युनिकॉर्नही येईल’.