-श्रेया उंबरेची राज्य कबड्डी स्पर्धेसाठी निवड
esakal October 19, 2025 01:45 AM

-rat18p1.jpg-
25N99332
सावर्डे : युनायटेड इंग्लिश स्कूलचा तृतीय क्रमांकाचा विजेता संघ व मार्गदर्शक शिक्षक.
-----
राज्य कबड्डी स्पर्धेसाठी
श्रेया हुंबरेची निवड
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १८ : चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूलची सतरा वर्ष वयोगटामधील श्रेया उंबरे हिची राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सतरा वर्ष वयोगट मुलींच्या कबड्डी संघाने विभागीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आयोजित कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेत परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित युनायटेड इंग्लिश स्कूलमधील सतरा वर्षे वयोगटामध्ये मुलींचा तृतीय क्रमांक आला. संघामध्ये श्रेया हुंबरे, ईश्वरी महाडीक, वैष्णवी महाडिक, सैवी भोबसकर, पायल अहिरे, श्रुती पोसनाक, श्रेया खाडे, आर्या पलांडे, प्रज्ञा थोरवडे व ईशा जाड्याळ या विद्यार्थ्यांचा समावेश होता. संघांमधील हुंबरे हिच्या अष्टपैलू खेळामुळे तिची राज्य निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.