मलकापूर : येथील मलकापूर फाट्यावर शिवशाही बस बंद पडल्याने नांदलापूर ते कोल्हापूर नाकादरम्यान वाहतूक कोंडी झाली. ऐन दिवाळीच्या धामधुमीत नागरिकांना सुमारे दोन तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांना पेट्रोलिंगवेळी वाहतूक काेंडी निदर्शनास आल्यावर त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून काही वेळात वाहतूक कोंडी सोडवली.
Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवाआज दुपारी दीडच्या दरम्यान महामार्गावर मलकापूर फाटा येथे शिवशाही बस बंद पडली. त्यामुळे वाहतूक काेंडी झाली. दिवाळीमुळे महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. त्यातच वाहनचालकांनी जागा मिळेल तिथून वाहने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने वाहतुकीची कोंडीचा अधिकच गुंता वाढला.
सहापदरीकरणाच्या कामामुळे दोन्ही बाजूची वाहतूक उपमार्गावरून वळवली आहे. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर येथील हद्दीत नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. महामार्गावरील वाहतूक व दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिकांची वाहनेही रस्त्यावर आल्याने महामार्गाच्या दोन्ही लेनवर वाहतूक कोंडी झाली. दोन मिनिटांच्या अंतराला सुमारे अर्धा तास लागत होता. दिवाळीमुळे नागरिकांनी खरेदीसाठी झुंबड उडाली होती. खरेदी करून परतताना कोंडी झाल्याने अनेकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.
MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात!दरम्यान, पोलिस उपअधीक्षक पाटील या पेट्रोलिंग करत असताना त्यांना हा वाहतूक काेंडीचा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ स्वतः महामार्गावर उतरत वाहतुकीची कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. उलट दिशेने आलेल्या वाहनधारकांना अडवल्यावर वादाचेही प्रसंग यावेळी घडले. महामार्ग पदाधिकाऱ्यांना तत्काळ दूरध्वनी करून काही मिनिटांतच क्रेन बोलावून बंद पडलेली बस तत्काळ महामार्गावर हटविली. त्यामुळे वाहतूक काेंडी काही वेळातच सुरळीत झाली.