बिहार विधानसभा निवडणुकीत एकाच मतदारसंघात एका उमेदवारानं दोन पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मधेपुरा जिल्ह्यातल्या आलमनगर विधानसभा मतदारसंघात हा प्रकार समोर आलाय. ई नवीन कुमार उर्फ नवीन निषाद असं नेत्याचं नाव आहे. त्यांनी आरजेडी आणि व्हिआयपी अशा दोन पक्षांच्या चिन्हावर अर्ज भरला आहे. महाआघाडीत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तिकीट कुणाला मिळणार हे स्पष्ट झालेलं नाही. त्यातच नवीन कुमार यांनी दोन पक्षांकडून अर्ज दाखल केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
नवीन कुमार यांनी गेल्या वेळी आरजेडीच्या तिकिटावर आलमनगर मतदारसंघातून निवडणूक लढली होती. यावेळी आरजेडीसह विकासशील इन्सान पार्टी (व्हिआयपी) पक्षाकडूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.नवीन कुमार यांनी सांगितलं की, पक्षाने दिलेल्या आदेशाचं मी पालन करतोय आणि पुढेही पक्षाच्या सूचनेनुसारच काम करे. या मतदारसंघात आधी मुकेश साहनी यांच्या पक्षाकडे प्रचाराची धुरा होती. आता ती मी घेतल्याचंही नवीन कुमार म्हणाले.
तिकिटासाठी २.७ कोटी मागितले! नेत्याचा आरोप, माजी मुख्यमंत्र्यांच्या दारात कपडे फाडून घेत जमिनीवर लोळलाएकाच नेत्यानं दोन पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महाआघाडीतला गोंधळ आणि जागावाटपातली गुंतागुंत समोर आली आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात हा वाद सुटण्याची शक्यता आहे. उमेदवाराकडून एका पक्षाचा अर्ज मागे घेण्याची किंवा पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
महाआघाडीत विकासशील इन्सान पार्टीला जवळपास १५ जागा देण्याचा विचार सुरू आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. पहिल्या टप्प्यातील अर्ज दाखल कऱण्याच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी हा निर्णय झाला. व्हिआयपी पक्षाकडून ३० जागा मागण्यात आल्या होत्या. मात्र शेवटी २० जागांवर ते ठाम राहिले. जर महाआघाडीला विजय मिळाला तर उपमुख्यमंत्रीपदाची इच्छाही व्यक्त केली होती. पण अजून काही निश्चित झालेलं नाही.