सोलापूर : येथील घोंगडे वस्तीतील धानप्पा श्रीशैल नरोणे या चाळीस वर्षीय तरुणाला कर्नाटकातील बंगळूर पोलिसांनी लातूर येथून अटक केली आहे. कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांना फोन करून शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी ही कारवाई झाली. जोडभावी पेठ पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. धानप्पा हा चॉकलेट आणि बिस्किटे विक्री करणाऱ्या एका कंपनीत सेल्समन म्हणून काम करतो, अशी माहिती त्याचा भाऊ नागेश यांनी दिली.
Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवामंत्री प्रियांक यांना धानप्पा याने तीन दिवसांपूर्वी फोन करून शिवीगाळ केली होती. कर्नाटकांतील माध्यमांत तो संवाद व्हायरल झाला. त्या संवादात धानप्पा हा प्रियांक यांना अश्लील शिव्या देताना आढळून आला आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांक खर्गे यांनी आरएसएसविरोधात वक्तव्य केले होते. त्यावरून संतप्त होऊन धानप्पा याने ही कृती केल्याचे व्हायरल संवादातून दिसत आहे. धानप्पा याने आपण आरएसएसशी जोडलेलो असल्याचेही त्या संवादात म्हटले आहे.
धानप्पा मद्यपी, आरएसएससी नाही संबंधवडील वही कारखान्यात तर आई इतरांच्या घरी धुणी भांडी करते. मी कपड्याच्या दुकानात कामाला आहे. आरएसएसशी आमचा कधीच संबंध आलेला नाही. माझा भाऊ धानप्पा याला दारूचे व्यसन आहे. तो आजवर कधीच संघाच्या शाखेत गेलेला नाही, अशी माहिती भाऊ नागेश नरोणे यांनी ‘सकाळ’ला दिली.
MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात! धानप्पावर अशी झाली कारवाई..मंगळवारी (ता. १४) सकाळी धानप्पा हा सेल्समन म्हणून लातूरला गेला. दोन दिवस आलाच नाही. बंगळूर पोलिसांनी १६ रोजी धानप्पाला जोडभावी पेठ पोलिसात आणले. तेथे धानप्पा यांच्या वडिलांना बोलावून घेतले. कर्नाटकातील मोठ्या साहेबांना शिवी दिल्यामुळे अटक करून नेत आहोत, असे सांगण्यात आले. कर्नाटक पोलिसांनी अटकेची माहिती दिल्याचे जोडभावी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज मुलानी यांनी सांगितले.