99573
सावंतवाडी परिसरात
अजगराला जीवदान
सावंतवाडी ः सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे पदाधिकारी शेखर सुभेदार आणि त्यांच्या मित्रमंडळींनी प्रमोद गावडे (कांडरकर) यांच्या घराशेजारी मध्यरात्री तीनच्या सुमारास सापडलेल्या १२ फुटी अजगराला पकडून वनविभागाच्या ताब्यात सुपूर्द केले. श्री. सुभेदार हे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सक्रिय पदाधिकारी असून, संस्थेच्या विविध सेवाभावी उपक्रमांत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या कार्याचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले.