'आत्मनिर्भर कोकण' अभियानाला चालना
esakal October 20, 2025 05:45 AM

99524

‘आत्मनिर्भर कोकण’ अभियानाला चालना

‘रोजगार-२०२५’ महोत्सवाचे सावंतवाडीत उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘आत्मनिर्भर कोकण’ या महत्त्वाकांक्षी अभियानाला चालना देण्यासाठी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये ‘उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सव २०२५’चे आयोजन केले आहे. याचा काल (ता.१८) पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला अनुसरून या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचा मुख्य उद्देश बेरोजगारांना व्यावसायिक दिशा देणे आणि बचतगटांच्या उत्पादनांपासून ते सर्व क्षेत्रांतील स्थानिक कोकणवासीय उद्योजकांच्या उत्पादनांना लोकाभिमुख बाजारपेठ मिळवून देणे हा आहे. सामाजिक बांधिलकी जपत, वाढदिवसाच्या निमित्ताने समाजसेवेला प्राधान्य देत युवा नेते विशाल परब यांनी कोकणाला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचा निर्धार केला आहे. याच निर्धारातून ‘मेक ईन कोकण’ या अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न या दोन दिवसीय प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. उद्घाटनप्रसंगी सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, महिला मंडळ अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर, मा. नगरसेविका सौ. दीपाली भालेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, सरचिटणीस दिलीप भालेकर, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगावकर, चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्र प्रमुख अमित गवंडळकर, बूथ अध्यक्ष विजू साटेलकर, रंगनाथ गवस, शिरीष नाईक, सुकन्या टोपले, नयना सावंत, मेघना साळगावकर, अनुषा मेस्त्री, ज्योती मुद्राले यांच्यासह सावंतवाडीतील नागरिक, उद्योजक, युवा, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा महोत्सव कोकणातील स्थानिक उद्योगांना एक मोठी संधी उपलब्ध करून देणार असून, ''लोकल टू ग्लोबल'' या संकल्पनेला बळ देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.