नाशिक: मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सिडकोतील कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे महाविद्यालयाच्या चार गुणवंत खेळाडूंनी जलतरण आणि तायक्वांदो प्रकारात विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत दिमाखदार कामगिरी केल्याने त्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दुर्भय खैरनार, हितेश पाटील (जलतरण) आणि कृपाल ओंदे, सुमेध जाधव (तायक्वांदो) अशी त्यांची नावे आहेत.
दुर्भय खैरनारने ५० मीटर फ्रीस्टाईल, १०० मीटर फ्रीस्टाईल आणि ५० मीटर बटरफ्लाय या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. हितेश जगदीश पाटील याने ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. या दोघांची लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जळगाव येथे झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत सुमेध मुकेश जाधव याने ४८ ते ५१ किलो वजन गटात प्रथम क्रमांक आणि कृपाल रवी ओंदे याने ५१ ते ५५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर आपली ताकद सिद्ध केली. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे. या सर्व खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. हेमंत काळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
IND vs AUS 1st ODI Live: भारतीय संघाला 'तोट्या'त टाकणारा निर्णय! षटकांची संख्या झाली कमी, ऑस्ट्रेलियाचा फायदा...दरम्यान राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. सोपान कुशारे यांच्यासह उपप्राचार्य प्रा. सोमनाथ घुले, विभाग प्रमुख प्रा. दीपक देवरे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. कमलेश पाटील, कला विभाग प्रमुख प्रा. विष्णू चौधरी, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. हेमंत काळे, दत्तात्रेय दुसाने, आबा थोरात, सोपान बिडगर, प्रभाकर गांगुर्डे आदी उपस्थित होते. मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आणि संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.