Vastu Tips For Diwali 2025: दिवाळी म्हणजे केवळ रोषणाईचा, फटाक्यांचा आणि मिठाईचा सण नाही, तर तो आध्यात्मिक शुद्धतेचा, सौंदर्याचा आणि लक्ष्मीमातेच्या स्वागताचा सण. यंदाची दिवाळी ही १७ ऑक्टोबर वसुबारस पासून सुरु झाली असून २० ऑक्टोबर रोजी नरक चतुर्थी आणि २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजा साजरी केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, यावर्षी नऊ ग्रहांची सकारात्मक स्थिती आहे, जी घरात धन, यश आणि शांतता घेऊन येण्यास मदत करू शकते. पण लक्ष्मीमातेचा वास घरात कायम राहावा, यासाठी फक्त दिवे लावणे किंवा पूजन करणे पुरेसे नाही.
वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि श्रद्धेच्या काही छोट्या पण प्रभावी कृती लक्ष्मीला तुमच्या घरी थांबवू शकता. चला तर पाहू, नऊ ग्रहांचे आशीर्वाद कसे मिळवता येतील आणि लक्ष्मीमातेचा स्वागत कसं करता येईल.
Daily Horoscope: आज इंद्र योगाचा शुभ संयोग! कर्क, मकरसह 'या' 5 राशींवर हनुमानाची राहील विशेष कृपा कोणते उपाय करावे? 1. पाच तांदळाचे दिवे लावाया वर्षी घराच्या पाच मुख्य दिशांमध्ये (पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्यभागी) शुद्ध तिळाच्या तुलांचे दिवे लावावेत. यासोबतच प्रत्येक दिव्यात थोडीशी साखर किंवा गूळ घालवा. असं मानलं जाते की, यामुळे घरात गोडवा आणि समृद्धी टिकते, तसेच नकारात्मक ऊर्जा दूर राहते.
2. मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूला ठेवा 'धन यंत्र'या दिवशी आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लक्ष्मी-कुबेर यंत्र किंवा श्री यंत्र प्रतिष्ठित करा. हे यंत्र चांदी, तांबे किंवा पीतळाच्या बनविलेल्या असावे, कारण याला विशेष शुभ मानले जाते. यंत्राच्या समोर दररोज दिवा लावल्यास आणि ‘ॐ श्रीं श्रीये नमः’ हा जप केल्यास धनसंचयात वृद्धी होते.
3. कमळाचे पानलक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीची मूर्ती किंवा चित्र कमळाच्या पानावर ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. कमळ हे शुद्धता, पवित्रता आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक असून, जेथे अशी शुद्धता आणि निर्मळता असते, तिथे लक्ष्मीमातेचा वास दीर्घकाळ टिकून राहतो.
4. धान्याचं पूजनदिवाळीच्या दिवशी घरातील मुख्य स्वयंपाकघरात थोडा तांदूळ जमा करा आणि त्यावर चिमूटभर हळद व सिंदूर ठेवा. या ठिकाणी एक लहानसा दिवा पेटवा आणि मनापासून प्रार्थना करा की, "हे अन्नकन्ये, तू आम्हाला कधीही उपाशी ठेवू नकोस." हा सोपा पण प्रभावी विधी वर्षभर अन्नधान्य पुरवठ्याची हमी देतो, असे मानले जाते.
Maharashtra Scholarship Exam: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत होणार बदल, 'असे' असेल स्वरुप 5. पवित्र जल तयार करादिवाळीच्या पहिल्या दिवशी तांब्याच्या भांड्यात गंगाजल (किंवा स्वच्छ पाणी), थोडं केशर, गुलाबजल आणि तुळशीचे एक पान टाका. या पवित्र जलाने घरातील मुख्य दरवाजे आणि सर्व कोपरे सावधपणे शिंपडा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक शक्ती स्थिरावते
6. नवीन खरेदी करताना ‘९’ चा महत्त्व लक्षात ठेवा२०२५ हे वर्ष ‘९’ अंकाचं आहे (2+0+2+5 = 9), जे पूर्णत्व, समाप्ती आणि नवीन सुरुवातीचे द्योतक आहे. दिवाळीत खरेदी करताना ९ वस्तू घेणे, ९ रुपये दान करणे किंवा ९ लोकांना मिठाई वाटणे शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या जीवनात नवीन उर्जा आणि समृद्धीचा प्रवाह सुरु होतो.
हे उपाय करासकाळी घंटा वाजवा, त्याच्या मधुर ध्वनीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
संध्याकाळी दक्षिणेकडे एक तुपाचा दिवा लावा, याने सकारात्मक वातावरण तयार होते.
घरात नेहमी चांगल्या सुंगधीची व्यवस्था ठेवा. धूप, अत्तर किंवा गंधफुंकर वापरा.
नेहमी सौम्य आणि संयमित राहा. खोटेपणा, राग किंवा द्वेष या भावना लक्ष्मीला दूर ठेवतात.