निमगाव केतकी, ता. १९ : गोतोंडी (ता. इंदापूर) येथील बनसोडेवस्ती येथे १०० के. व्ही क्षमतेचे नवीन विद्युत रोहित्र बसविले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. रोहित्र बसविल्यानंतर ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
बुधवारी (ता. १५) नवीन रोहित्राचे उद्घाटन सारिका भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तात्यासाहेब बनसोडे, नानासाहेब बनसोडे, प्रदीप बनसोडे, गणेश बनसोडे, दादाराम पवार, अमोल पवार, आजिनाथ बनसोडे, संदीप बरळ उपस्थित होते.
तात्यासाहेब बनसोडे म्हणाले की, ‘‘मागील अनेक दिवसांपासून या ठिकाणी अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे पंप चालत नव्हते. त्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागत होते. या ठिकाणी नवीन रोहित्र बसवावे, यासाठी आम्ही वस्तीवरील लोकांनी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे मागणी केली असता, त्यांनी आमच्या मागणीची दखल घेत रोहित्राचा प्रश्न सोडवला आहे.’’
02982