घरच्यांच्या विरोधामुळे प्रेमी युगुलाने गळफास घेत आत्महत्या केली.
दोघेही बीड जिल्ह्यातील रहिवासी असून अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात होते.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
संदीप भोसले, साम टीव्ही, प्रतिनिधी
Latur Crime : लातूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमसंंबंधांना विरोध केल्याने लातूरमध्ये एका प्रेमी युगुलाने गळफास घेत आत्महत्या केली. लातूर शहराजवळ असणाऱ्या पेठ गावच्या शिवारात ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर शहराच्या ४ किलोमीटरवर असलेल्या पेठ गावच्या शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये प्रेमी युगुलाने गळफास घेत जीवन संपवले. दोघेही बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी येथील रहिवाशी असल्याचे म्हटले जात आहे. नात्याला घरच्यांचा विरोध असल्याने दोघांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Pune Shaniwar Wada : पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण? Videoतरुणी ही लातूर येथील एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होती. तर तिचा प्रियकर हा लातूरच्या अहमदपूर येथे एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तो शारीरिकदृष्ट्या अपंग आहे. दोघेही अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात होते, तरुणी आणि तिचा प्रियकर दोघेही भावकीत होते. त्यांच्या प्रेमसंबंधाला घरच्यांचा प्रचंड विरोध होता.
दिवाळीसाठी घरी निघालेल्या मित्रांना वाहनानं चिरडलं! दोघांचा जागीच मृत्यू, तिसऱ्याची प्रकृती गंभीरभावकीमध्ये असल्याने आणि तरुण शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याने तरुणीच्या घरातून प्रेमाला, लग्नाचा विरोध सुरु होता. याशिवाय तरुणाच्या कुटुंबीयांनाही ही गोष्ट मान्य नव्हती. कायमच एकत्र राहण्यासाठी दोघांनी टोकाचे पाऊल उचलले. या आत्महत्या प्रकरणाचा तपास लातूर ग्रामीण पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत आहेत. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
10 लाखांचे कर्ज काढले अन्...; घरकाम करणाऱ्या महिलेने 60 लाखांचा 3 BHK फ्लॅट खरेदी केला, प्रकरण कळताच नेटकरी हैराण