जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत आहात आणि तुमचे तिकीट हरवले, तर लागलीच टीटीईला सांगा. ते तुमची सिट आणि बुकींग चेक करुन तुम्हाला दुसरा कोणता तरी पर्याय देऊ शकतात.वा तुमची माहीती योग्य निघाली तर तुम्हाला मॅन्युअल ( कागदी) तिकीटाशिवाय प्रवास करता येईल.
टीटीईशी बोलल्यानंतर नॉर्मली तुम्हाला एक अधिकृत सूचना लिहून दिली जाईल तो कागद सांभाळून ठेवा. हा कागद पुढच्या प्रवासात तु्म्हाला पुरावा म्हणून कामी येईल. या शिवाय फोटो आयडी उदा. आधार, पासपोर्ट किंवा मतदान कार्ड दाखवणे गरजेचे असते.
ई- तिकीट हरवले किंवा फोन गायब झाला तरी मार्ग आहे. जर पीएनआर वा बुकींग कन्फर्मेशनचा स्क्रीनशॉट नसेल तर तुम्ही कोणत्या नाव आणि आयडीने बुकींग केले ते टीटीईला सांगा. टीटीई ऑनलाईन तुमच्या बुकींगची तपासणी करुन खात्री करु शकतात.
जर टीटीई तुमचे म्हणणे ऐकत नसेल आणि दंड लावत असेल किंवा ट्रेनमधून उतरण्यास सांगत असेल तर तुम्ही टीटीईची तक्रार करु शकता. यासाठी रेल्वेच्या १३९ हेल्पलाईनचा तुम्ही वापर करु शकता. आणि तुमची तक्रार करु शकता.
जे लोक नेहमी प्रवास करतात. त्यांच्यासाठी टिप्स गरजेच्या आहेत. तिकीटाचा फोटो किंवा स्क्रीनशॉट क्लाऊडमध्ये ठेवा, पेपर तिकीटाचाही एक फोटो वेगळ्या फोनमध्ये ठेवा किंवा स्वत:ला ईमेल करुन ठेवा. ट्रॅव्हलिंग करताना डॉक्युमेंट एका छोट्या इन्व्हलपमध्ये ठेवा आणि एक कॉपी स्वत:सोबत बाळगा.
तिकीट हरवण्याच्या बहुतांशी प्रकरणात टीटीईशी बोलल्यानंतर ते तुमचा प्रवास न थांबवता जारी करण्यास सांगतात. जर कोणतीही अडचण आली तर टीटीईशी अशा क्षणी काय बोलायचे असते या संदर्भात नियमांचे माहिती काढून घेऊ शकता.