ओतूर, ता. १९ ः ओतूर (ता. जुन्नर) येथे दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर दिवाळी पहाट संगीत महोत्सव कार्यक्रम होणार आहे. कपर्दिकेश्वर देवधर्म संस्था, शिवनेरीचे शिलेदार समूह व ग्रीन व्हिजन फाउंडेशन संयुक्तपणे त्याचे आयोजन करणार असल्याची माहिती आयोजक रमेश डुंबरे यांनी दिली. गेल्या दोन वर्षांपासून ओतूरमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांच्या सुमधूर गायनाची मैफिल बुधवारी (ता. २२) पहाटे ५.३० वाजता स्व. आ. श्रीकृष्ण रामजी तांबे कुस्ती स्टेडियम, कपर्दिकेश्वर मंदिर येथे आयोजित केली आहे. या कार्यक्रमाला ओतूर व परिसरातील सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.