Solapur News: 'सोलापूर शहराच्या पाणीपुरवठा वेळेत बदल अशक्य'; महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाची माहिती
esakal October 20, 2025 12:45 PM

सोलापूर : शहराला तीन दिवसाआड पाणी द्या, तसेच वेळेत बदल करा, अशी मागणी नागरिकांची आहे. मात्र तांत्रिक अडचणी लक्षात घेता पाणीपुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही. शहराला तीन, चार अन् पाच दिवसांआड पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवा

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर विजेमुळे शहर पाणीपुरवठा विस्कळित झाला. शहर हद्दवाढ भागातील नागरिकांनी पाच दिवसाआड पाणी देता, पाण्याच्या वेळा तरी पाळा आणि नागरिकांना सोयीच्यावेळी पाणीपुरवठा करा, अशी मागणी जनता दरबारमध्ये केली होती. मात्र महापालिकेने तांत्रिक कारणामुळे सध्या शहराचा पाणीपुरवठा जैसे-थे राहील, असे स्पष्ट केले आहे.

यामध्ये साखर पेठ, रेल्वे लाईन, विजापूर वेस, सेटलमेंट, बाळे, देगाव, भद्रावती पेठ पाणी टाकी परिसर, दोन नं. झोपडपट्टी या ठिकाणी तीन दिवसाआड आणि आदित्य नगर, सोरेगाव रोड, नेहरू नगर टाकी परिसर, सैफूल हॉटेल परिसर येथे चार दिवसांआड तर उर्वरित शहर हद्दवाढ भागात पाच दिवसांआड पाणी दिले जाते. हा पाणीपुरवठा कायम असणार आहे. वेळेत आणि दिवसांमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

शहराला सध्या सुरू असलेला पाणीपुरवठा सुरळीत आहे. तांत्रिक कारणांमुळे यामध्ये कोणतेही बदल करू शकत नाही. शहरात काही ठिकाणी तीन, चार तर हद्दवाढ भागात पाच दिवसांआड पाणी आहे. सर्वांना पाणी वेळेवर उपलब्ध करून देण्यात आहे.

- व्यंकटेश चौबे, अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियंता

MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात! या परिसरातील वेळ बदलण्याची मागणी

विजापूर रोड, जुळे सोलापूर, मदनी नगर, मिल्लत नगर, वजीर नगर, रूबी नगर, समर्थ नगर, सिंधू विहार या परिसरामध्ये नुकतीच नवीन पिण्याच्या पाण्याची उच्च दावाची (हाय-प्रेशर) पाइपलाइन टाकण्यात आलेली आहे. मात्र, या भागात पाणी कमी दाबाने येत असून नागरिकांना पुरेशा प्रमाणात मिळत नाही. तसेच सध्या पाणीपुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत केला जातो. त्याऐवजी पहाटे पाच ते सकाळी साडे नऊ या वेळेत किंवा सायंकाळी सहा ते रात्री अकरा या वेळेत करण्याची मागणी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.