कऱ्हाड: महामार्गाकडेच्या गोटे गावच्या हद्दीतील एका बारमध्ये पती- पत्नी दारू पिऊन नाचत असताना मारामारीचा प्रकार घडला. दारू पीत गाण्यावर हातवारे करणाऱ्या पती-पत्नीस शेजारील टेबलवर दारू पीत असणाऱ्या तिघांनी मारहाण केली. याप्रकरणी जखमीने फिर्याद दिली असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवायाबाबत पोलिसांची माहिती अशी ः येथील हायवेच्या एका हॉटेलच्या बारमध्ये जखमी फिर्यादी व त्याची पत्नी रात्री दारू पीत बसले होते. त्या वेळी संबंधितापैकी पतीने वेटरला टेप सुरू करण्यास सांगितले. त्यानंतर पती- पत्नी दोघे जण हातवारे करायला लागले. त्यावेळी शेजारील टेबलवर बसणाऱ्या युवकांचा दंगा सुरू झाला. फिर्यादीने वेटरला बोलावून शेजारी बसलेल्या युवकांना दुसऱ्या टेबलवर बसण्यास सांगा असे सांगितले.
त्यानंतर त्या युवकांनी ‘तू आम्हाला बसलेल्या टेबलवरून उठायला का सांगितले’, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. त्या मारहाणीत फिर्यादीच्या तोंडावर, कपाळावर, नाकावर मार लागला. त्यावेळी फिर्यादीची पत्नी भांडणे सोडविण्यासाठी गेली असता तिलाही मारहाण करण्यात आली.
MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात!त्यावेळी तिथे हॉटेलचे मालक श्री. पाटील यांनी हस्तक्षेप करत भांडणे सोडवली. याप्रकरणी शहर पोलिसात मारहाण झालेल्या पतीने फिर्याद दिली आहे. यावरून अनोळखी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.