योगेश काशीद
बीड : राज्यात आरक्षणाचा मुद्दा गाजत आला आहे. दरम्यान आरक्षणासाठी समाज बांधव टोकाचा निर्णय घेत जीवनयात्रा संपविल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. अशात धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर समाज बांधवाने आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. दरम्यान आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट आढळून आली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
बीडजिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे सदरची घटना घडली असून योगेश बबन चौरे (वय ३३) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. योगेश चौरे हा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभागी झाला होता. आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने योगेश चौरे याने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. यामुळे समाज बांधव आक्रमक झाले असून योगेशच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळलीसुसाईट नोट लिहत संपविले जीवन
आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने दरम्यान याच ठिकाणी एक सुसाईड नोट आढळून आली असून पोलीस या अनुषंगाने माहिती आणि तपास करत आहेत. दरम्यान आत्महत्याग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते भारत सोन्नर यांच्यासह धनगर समाजाने मादळमोही पोलीसचौकीत ठिय्या मांडला आहे.
Ahilyanagar Crime : धक्कादायक! खोटे रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार; मृत्यूनंतर अवयवांची तस्करी, ६ डॉक्टरांवर गुन्हे दाखलआठवडाभरात दुसरी घटना
आरक्षणासाठी टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याच्या घटना राज्यात घडत आल्या आहेत. अशीच घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडली असून मागील आठवडाभरापूर्वीच गेवराई तालुक्यात एका धनगर समाजाच्या बांधवाने आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे.