Ahilyanagar Crime : धक्कादायक! खोटे रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार; मृत्यूनंतर अवयवांची तस्करी, ६ डॉक्टरांवर गुन्हे दाखल
Saam TV October 20, 2025 08:45 AM

सुशील थोरात 

अहिल्यानगर : रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर म्हणजे नवजीवन देणारा दाता मानला जात असतो. मात्र याच डॉक्टरांकडून धक्कादायक कृत्य करण्यात आल्याचा प्रकार अहिल्यानगर शहरात समोर आला आहे. खोटे रिपोर्ट करून रुग्णांवर चुकीचे उपचार करणे. यात मृत झालेल्या रुग्णांच्या अवयव तस्करी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शहरातील नामांकित सहा डॉक्टरांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

घशाच्या त्रासासाठी रुग्णालयातदाखल झालेल्या ७९ वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली असून अहवाल पॉझिटिव्ह नसतानाही खोटे रिपोर्ट बनविले. यामुळे चुकीचे उपचार दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. अशोक खोकराळे यांचे वडील बबनराव खोकराळे यांना १३ ऑगस्ट २०२० रोजी घशात खवखव आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत होता. त्यांना डॉ. सचिन पांडुळे यांच्या पटियाला हाऊस येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले. त्यावेळी वडिलांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल असूनही त्यांना निरीक्षणाखाली ठेवले. मात्र त्यानंतर संबंधित डॉक्टरांनी अशोक खोकराळे यांची वडिलांसोबत भेटच होऊ दिली नाही. 

Kalyan Accident : कल्याणमध्ये अपघाताचा भीषण थरार; मद्यधुंद कारचालकाने ६-७ वाहनांना उडवलं

अद्यापपर्यंत मृतदेह मिळाला नाही 

दरम्यान १८ ऑगस्टला अशोक खोकराळे यांना १ लाख ८४ हजार रुपयांचे बिल भरण्यास सांगितले. बिल भरल्यानंतर त्यांना तुमच्या वडिलांचा मृत्यू झाला असून तुम्ही वडिलांचा मृतदेह घेण्यासाठी जिल्हा रुग्णालय आणि महानगरपालिकेची संपर्क करावा असे सांगण्यात आले. तेव्हापासून अशोक आपल्या वडिलांच्या मृतदेहाच्या शोधात असून अद्यापपर्यंत त्यांच्या वडिलांचा मृसदेह न सापडल्याने त्यांनी याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. मात्र पोलिसांनी याची दखल न घेतल्याने न्यायालयात धाव घेतळी. 

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

अखेर कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल 

त्यानुसार न्यायालयाच्या आदेशाने कोरोना नसताना खोटे आरटीपीसीआर रिपोर्ट बनवले. पैसे उकळण्यासाठी जाणीवपूर्वक चुकीचे उपचार दिले. रुग्णाला बेडला बांधून ठेवले, धमकावले आणि जेवणही दिले नाही. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार दाखवून बिले उकळली. पुरावा नष्ट करण्यासाठी आणि अवयव तस्करीच्या हेतूने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली, असे गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आले आहेत. दरम्यान उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशावरून तोफखाना पोलीस ठाण्यात अहिल्यानगर शहरातील सहा नामांकित डॉक्टरांसह अनोळखी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल 

न्युक्लिअस हॉस्पिटलचे डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर , डॉ. सचिन पांडुळे, डॉ. अक्षयदीप झावरे, डॉ. मुकुंद तांदळे आणि डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल लॅबचे तज्ञ डॉक्टर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. कटकारस्थान, फसवणूक, आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.