IND vs AUS 1st ODI Live: रोहित शर्मा गेला! मिचेल स्टार्कच्या सहाव्या चेंडूवर वाचला, पण जॉश हेझलवूडच्या 'उसळी'ने घात केला...
esakal October 20, 2025 12:45 AM

India vs Australia 1st ODI Marathi Cricket News : विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यासाठी ऑस्ट्रेलिया दौरा किती महत्त्वाचा आहे, हे वेगळं सांगायला नको.. दोघांनाही २०२७ चा वर्ल्ड कप खेळायचा आहे, परंतु वय त्यांच्या मार्गात आडवं येतंय. त्यासाठी त्यांना स्वतःची फिटनेस आणि फॉर्म या मालिकेत दाखवून द्यावा लागणार आहे. भारतीय संघात आज नितीश कुमार रेड्डीने पदार्पण केले आहे आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्यासह तीन अष्टपैलू खेळाडू दिसत आहेत. ऑस्ट्रेलियानेही दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे.

रोहितचा हा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे आणि हा टप्पा ओलांडणारा तो पाचवा भारतीय व जगातील ११ वा खेळाडू आहे. भारताकडून सचिन तेंडुलकरने सर्वाधिक ६६४ सामने खेळले आहेत. त्यानंतर विराट कोहली ( ५५१), महेंद्रसिंग धोनी ( ५३५) व राहुल द्रविड ( ५०४) यांचा क्रमांक येतो. भारताने वन डे क्रिकेटमध्ये सलग १६ व्या सामन्यात नाणेफेक गमावली आहे. भारताने २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा टॉस जिंकला होता.

IND vs AUS 1st ODI Live: रोहित शर्माचा भारी विक्रम, विराटलाही संधी; भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूचे पदार्पण, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल

रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी सलामीला आली. मिचेल स्टार्कचे पहिले षटक दोघांनी सावधपणे खेळून काढले. पण, त्या षटकातील सहाव्या चेंडूवर रोहित थक्क झाला. स्टार्कने टाकलेला चेंडू अचानक आत वळला आणि बरोबर स्टम्प्सच्या वरून यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. रोहितला आश्चर्यचकित करणारा तो चेंडू होता आणि स्टार्कच्या चेहऱ्यावर हसू होतं.

त्यानंतर रोहित जरा जास्तच सावध झाला. पण, चौथ्या षटकात हेझलवूडने त्याला माघारी पाठवले. पहिले दोन चेंडू हेझलवूडने जरा कमी उसळीचे फेकले आणि अचानक चौथ्या चेंडूची उसळी वाढवली. त्यावर रोहित चुकला आणि स्लीपमध्ये मॅथ्यू रेनशॉ याच्या हाती झेल देऊन परतला. रोहितने १४ चेंडूंत १ चौकारासह ८ धावा केल्या.

भारत : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, मॅथ्यू शॉर्ट, जॉश फिलिप, मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जॉश हेझलवूड

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.