Supriya Sule : जैन बोर्डिंग जागेच्या व्यवहाराची तपासणी करा, खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Sarkarnama October 19, 2025 09:45 PM

Supriya Sule News : SHND जैन बोर्डिंगची जागा खरेदी व्यवहाराचा मुद्दा तापला आहे. जैन समुदायाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या व्यवहार चुकीच्या पद्धतीने झाल्याचे म्हटले आहे. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालून माननीय धर्मदाय आयुक्त, मुंबई यांना तातडीने सुनावणी घ्यायला सांगावे तसेच व्यवहारावर त्वरित स्थगिती द्यावी, हीच सर्व जैन बांधवांची एकमुखी मागणी आहे. ती मान्य करावी असे म्हटले आहे.

सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, पुण्यामध्ये सन 1958 मध्ये सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टने पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत SHND जैन बोर्डिंगची जागा खरेदी केली. त्या खरेदी खतामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की ही जागा ज्या उद्देशाने घेण्यात आली - म्हणजेच शैक्षणिक आणि धार्मिक कार्यासाठी - त्याच उद्देशासाठी कायमस्वरूपी वापरली जावी. मात्र, आज या जागेची विक्री करून त्या मूळ उद्देशाशी प्रतारणा करण्यात येत आहे, ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे.

'माननीय धर्मदाय आयुक्त, मुंबईयांच्या समोर या संदर्भातील अनेक प्रकरणे प्रलंबित असताना एवढ्या घाईघाईने या जागेच्या विक्रीचा निर्णय घेण्यात का आला, हा प्रश्न समाजाला पडला आहे. सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या घटनेत कुठेही जागा विक्रीबाबत तरतूद केलेली नाही. तरीसुद्धा या जागेच्या विक्रीस परवानगी देण्यात आली, यामागे नक्की कोणाचे हितसंबंध आहेत हे उघड व्हायला हवे.', अशी देखील त्यांनी मागणी केली.

Murlidhar Mohol : बिळात बसलेला उंदीर बाहेर आला अन्..! जमीन प्रकरणावर मोहोळांचा मोठा खुलासा, धंगेकरांच्या ‘बॉम्ब’ची वात विझवली...

'ट्रस्टकडे हॉस्टेल दुरुस्तीकरिता निधी नसल्याचे कारण देण्यात आले, पण मागील दोन वर्षांत ट्रस्टचे तब्बल चौदा कोटी रुपये अन्य कंपनीकडे वळवण्यात आले, ही बाब अधिकच संशयास्पद आहे. 1960 पासून या परिसरात असलेले भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आज धोक्यात आले आहे. मंदिराला तातडीने पोलिस सुरक्षा देण्यात यावी.', अशी सर्वांची मागणी असल्याचे देखील सुळे यांनी म्हटले आहे.

Sanjay Gaikwad : डिफेंडरमुळे गोत्यात आलेल्या संजय गायकवाडांसाठी ठेकेदार ढवळे मैदानात; म्हणाले, 'इम्प्रेशनसाठी आमदाराचा सिम्बॉल, कर्ज काढून...'
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.