दिवाळी म्हटलं की फराळ आलाच! पण मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे (Wheat Shankarpali) हेल्दी आणि पचायला हलके असतात.
शंकरपाळे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर, तोंडात टाकताच विरघळणारे होतात.
गव्हाचे पीठ : ५ कप,दूध : १ कप,साखर (पिठी) : सव्वा कप,साजूक तूप : १ कप,वेलची पूड : अर्धा चमचा,मीठ : चवीनुसार
पॅनवर दूध आणि पिठी साखर घालून विरघळेपर्यंत ढवळून घ्या. गॅस बंद करून त्यात तूप घाला आणि एकजीव करून मिश्रण कोमट करा.
कोमट मिश्रणात मीठ आणि वेलची पूड घालून मिक्स करा.त्यात हळूहळू गव्हाचे पीठ घालून कणिक मळून घ्या. कणिक १० मिनिटे चांगली मळा.
पीठाचा गोळा घेऊन ठेचा म्हणजे तो मऊ होईल.चपाती लाटून तिला गोल आकारात दुमडा, पुन्हा गोळा करा आणि पुन्हा लाटा. असे केल्याने जास्त पदर सुटतील.
लाटलेल्या पोळीचे चौकोनी आकारात तुकडे करा.
कढईत तेल तापवा आणि त्यात शंकरपाळे मंद आचेवर लाल होईपर्यंत तळा. मंद आचेवर तळल्याने त्या खुसखुशीत होतात आणि कमी तेलकट राहतात.
तयार शंकरपाळे टिश्यू पेपरवर ठेवून तेल निघू द्या. बिस्किटासारख्या खुसखुशीत आणि भरपूर पदर सुटणाऱ्या गव्हाच्या शंकरपाळ्या आता तयार आहेत!