Gold & Silver Rate : दिवाळीच्या तोंडावर चांगली बातमी! सोने दरात 4 हजार, तर चांदी दरात २२ हजारांची घसरण
esakal October 19, 2025 09:45 PM

Gold Rate Down : गेल्या महिन्याभरापासून उच्चांकी पातळीवर पोहाेचलेल्या सोने-चांदीच्या दरात शनिवारी मात्र घसरण झाली. दरवाढीमुळे अगोदरच बाजारात शुकशुकाट असताना दीपावली पाडव्याच्या तोंडावर दरात झालेल्या घसरणीमुळे बाजारात खरेदी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज सोन्याच्या प्रतितोळा दरात चार हजार रुपये, तर चांदीच्या प्रतिकिलो दरात २२ ते २३ हजार रुपयांची घसरण झाली. शनिवारी सोन्याचा प्रतितोळा दर एक लाख ३४ हजारांच्या आसपास होता, तो शनिवारी एक लाख ३१ हजारांपर्यंत खाली आला. चांदी प्रतिकिलो एक लाख ९० हजारांवर होती, ती शनिवारी एक लाख ६८ हजारांपर्यंत खाली आली.

Gold Reserves: आरबीआयचा सोन्याचा साठा पहिल्यांदाच 100 अब्ज डॉलर्सच्या वर; भारताचा परकीय चलन साठा किती आहे?

गेल्या महिन्याभरापासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. महिन्यापूर्वी प्रतितोळा ९० हजार असणारे सोने शुक्रवारी एक लाख ३४ हजारांवर पोहाेचले होते. यात वाढ होईल, असा अंदाज असताना शनिवारी अचानक चार हजार रुपयांची घट झाली. भाऊबीजनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याचा अंदाज सराफ बाजारातून व्यक्त होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.