आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एका कार्यक्रमात ठाकरे गटावर टीका केली आहे. घोडा मैदान जवळ आहे. ठिकऱ्या कोणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल. स्वतःच्या विचारांवर आणि भूमिकेवर ठाम न राहणाऱ्या लोकांचा बँड जनता वाजवते आणि ठाणेकर नक्की वाजवतील, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली होती. आता यावर खासदार संजय राऊत यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. ठाण्यातील जनता तुमच्या गद्दारांच्याच ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या विधानावर प्रतक्रिया दिली. ठाण्यात आणि मुंबईत ठिकऱ्या गद्दारांच्या उडतील. खरतंर विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत घोटाळा केला नसता, तर तेव्हाच ठिकऱ्या उडाल्या होत्या. महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला निवडून आणलेले नाही, असा आरोप संजय राऊतांनी केला.
हे महापालिका निवडणुकीत चालणार नाहीइतक्या जागा जिंकूनही महाराष्ट्रात कुठेही जल्लोष झाला नाही. निवडणूक यंत्रणेला हाताशी धरुन, मतदार यादीत घोटाळे करुन, पैशांचा प्रचंड वापर करुन, यंत्रणा विकत घेऊन आपण जिंकलेले आहात. हे महापालिका निवडणुकीत चालणार नाही. निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय शिष्टमंडळाने हा पहिला हल्ला केला आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेटून निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांमधलं जे साटेलोटं आहे, हे उघड केलं आहे, असे संजय राऊत म्हणाले.
आता एक पाऊल पुढे जाईल. या सर्वपक्षीय शिष्टमंडळात जे सर्व प्रमुख नेते त्यांची आपापसात चर्चा सुरु आहे. निवडणूक आयोग दबावखाली काम करत आहे. आपण वारंवार निवदेन देतोय, पुरावे देतोय, तरीही निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल तर निवडणूक आयोगाला रस्त्यावर उतरुन दणका द्यावा लागेल, अशाप्रकारचे एकमत सर्वपक्षीय नेत्यांमध्ये होताना दिसत आहे, असे संजय राऊतांनी सांगितले.
तुमच्या गद्दारांच्याच ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाहीकालच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली. शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ यांच्यातही चर्चा सुरु आहे. निवडणूक आयोगाला सोडणार नाही. तसेच घोटाळे करणाऱ्यांनाही क्षमा केली जाणार नाही. त्यामुळे ठाणे आणि मुंबईत त्यांचे जे स्वप्न आहे की घोटाळा करुन पुन्हा निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची, त्यांना जाऊन सांगा की मुंबई, ठाण्यातील जनता तुमच्या गद्दारांच्याच ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय राऊतांनी दिला.