टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेची सुरुवात विजयाने करण्यात अपयश ठरली. मिचेल मार्श याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने पर्थमध्ये टीम इंडियाला 7 विकेट्सने पराभूत करत 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने पावसामुळे 26 ओव्हरच्या झालेल्या सामन्यात 136 धावा केल्या. मात्र ऑस्ट्रेलियाला डीएलएसनुसार 131 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाने या विजयासह 1-0 ने आघाडी घेतली. अशाप्रकारे शुबमन गिल कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यात अपयशी ठरला. आता टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. टीम इंडियाने या दुसऱ्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला एका प्रकारे इशाराच दिला आहे.
बीसीसीआयने टीम इंडियाच्या पराभवानंतर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट केली. “ऑस्ट्रेलियाने पहिला सामना 7 विकेट्सने जिंकला. तसेच टीम इंडिया पुढील सामन्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल”, अशी पोस्ट करत बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाला इशाराच दिलाय. तसेच बीसीसीआयने या पोस्टमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचा एक फोटोही शेअर केला आहे.
ऑस्ट्रेलियाने या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यासह टीम इंडियाला आणखी एक झटका दिला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा एकदिवसीय क्रिकेटमधील विजयरथ रोखला. भारताने याआधी सलग 8 एकदिवसीय सामने जिंकले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं आणि सलग नवव्या विजयापासून रोखलं. टीम इंडियाचा 2025 या वर्षातील एकदिवसीय क्रिकेटमधील पहिला पराभव ठरला.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा गुरुवारी 23 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे एडलेड ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियासमोर हा सामना जिंकून मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्यासह इंग्लंडला सीरिज नावावर करण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे.
बीसीसीआयची एक्स पोस्ट व्हायरल
विराट कोहली आणि रोहित शर्मा या अनुभवी जोडीकडून भारतीय चाहत्यांना अनेक आशा होत्या. मात्र या दोघांनी पहिल्या सामन्यात निराशा केली. रोहितने 8 रन्स केल्या. तर विराटला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे आता या दोघांसमोर दुसऱ्या सामन्यात चांगली खेळी करण्यासह टीम इंडियाला भक्कम सुरुवात मिळवून देण्याचं आव्हान असणार आहे.