Black Cat And Halloween : भारतात जशी अंधश्रद्धा आहे, तशाच पद्धीच्या अंधश्रद्धा परदेशातही पाळल्या जातात. भारतात काळ्या मांजरीला अपशकुनाशी जोडले जाते. प्रत्यक्ष मात्र मांजर आणि भविष्यातील घडामोडी यांचा काहीही संबंध नसतो. दरम्यान, स्पेन देसात याच काळ्या मांजरींसदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एका शहरात काळ्या मांजरींना समोर ठेवून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे प्राणीप्रेमी स्वागत करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार स्पेनमधील बार्सिलोनाच्या उत्तरेस टेरासा नावाचे एक शहर आहे. या शहरात काळ्या मांजरीला सांभळण्यावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. स्पेनमध्ये हॅलोवीन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हाच सण समोर ठेवून अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल आहे. 6 ऑक्टोबर रोज या निर्णयाची घोषणा झाली आहे. या घोषणेनुसार 1 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या काळात काळ्या रंगाची मांजर पाळण्यासाठी जे लोक अर्ज करताली, त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या निर्णयाचा थेट संबंद हॅलोवीन या सणाशी लावला जात आहे. तेथील स्थानिक वृत्तपत्र डायरी डी टेरसानुसार टेरसा या शहरातील पशू कल्याण विभागाचे अधिकारी नोएल ड्यूक यांनी दिलेल्या माहितीनुसार हॅलोवीन या सणाच्या काळात काळी मांजर सांभाळायला मिळावी, अशी मागणी करणारे अर्ज येतात. या काळ्या मांजरींचा सजावटीसाठी उपयोग केला जातो. अशा प्रकारे मांजरीचा उपयोग होणे हा त्या मांजरीवर अन्याय आहे. म्हणूनच 1 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या काळात काळ्या रंगाच्या मांजरीला सांभाळायला द्या, अशी मागणी करणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले आहे.
हॅलोवीन हा सण प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी लोक भीतीदायक वाटणारे ड्रेस परिधान करतात. त्यानंतर एकत्र येऊन हा सण साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी घराचीही सजावट केली जाते. या सजावटीसाठी काळ्या मांजरीचाही काही लोक उपयोग करतात. हा उपयोग थांबवण्यासाठी स्पेनमधील टेरसा या शहराने मांजर पाळण्यासाठी परवाना न देण्याचा निर्णय घेतला आहे.