rat19p14.jpg-
99511
प्रा. लक्ष्मीकांत पांडुरंग पाटील.
प्रा. लक्ष्मीकांत पाटील यांना
आदर्श शिक्षक पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १९ : जनकल्याण सामाजिक सेवा संस्था, कोल्हापूर यांच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला असून, दापोली येथील वराडकर-बेलोसे महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. लक्ष्मीकांत पांडुरंग पाटील यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
एम. ए., बी. एड., एम.फिल. पदवीधारक असलेले प्रा. पाटील जून १९९७ पासून दापोलीतील वराडकर-बेलोसे वाणिज्य आणि शांतीलाल जैन सायन्स कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहेत. २००४-०५ मध्ये आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभाग सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या विभागामार्फत ‘उड्डाण’ आणि ‘युवा महोत्सव’ हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. ते महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय अर्थशास्त्र विचार मंचाचे आजीवन सदस्य आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा. लक्ष्मीकांत पांडुरंग पाटील यांना प्राप्त झालेला ‘आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार’ हा त्यांच्या कार्याचा उचित गौरव मानला जात आहे.