पर्थच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेली विजयाची मालिका मोडली. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताचा पहिला पराभवही ठरला आहे. खरं तर या सामन्यात पावसाने वारंवार व्यत्यय आणला त्यामुळे शेवटी कुठे जाऊन 26 षटकांचा सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने 26 षटकात 136 धावा केल्या. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 131 धावांचं टार्गेट दिलं गेलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 21.1 षटकात तीन गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 29 चेंडू शिल्लक ठेवले. या पराभवाची पाच कारणं सांगितली जात आहेत. चला जाणून घेऊयात त्याबाबत
पर्थची खेळपट्टी : टीम इंडियाला पर्थच्या खेळपट्टीचा अंदाज आला नाही. ही खेळपट्टी उसळी घेत होती. त्यामुळे रोहित शर्मासारखा खेळाडूही फटके मारता चुकला. त्यामुळे इतर फलंदाजांनाही धावा करणे कठीण झाले. त्यातल्या त्यात केएल राहुलने 38 आणि अक्षर पटेलने 31 धावा केल्या. यांच्याशिवाय कोणताही भारतीय फलंदाज 20 धावा ओलांडू शकला नाही. ऑस्ट्रेलियाने 44 धावांत 2 विकेट गमावूनही 6 धावांच्या धावगतीने धावफलक पुढे नेला.
फलंदाजीचा क्रम : भारतीय फलंदाजीत केलेल्या बदलाचा फटका बसला. चौथ्या क्रमांकापर्यंत तशीच फलंदाजी होती. पण केएल राहुलच्या आधी अक्षऱ पटेलला पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. केएल राहुलची वनडे सरासरी ही 56 आहे. तर नितीश कुमार रेड्डीला सहाव्या क्रमांकावर पाठवलं असतं तर चांगली धावसंख्या करू शकला असता. पण वॉशिंग्टन सुंदरला पुढे प्राधान्य दिलं गेलं.
शॉट्सची निवड : या सामन्यात फलंदाजांनी केलेल्या शॉट्सची निवड चर्चेचा विषय ठरला. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू खेळताना विराट कोहली विकेट देऊन बसला. तर कर्णधार शुबमन गिल लेग साईडला चाललेल्या चेंडूवर नियंत्रण करू शकला नाही. वॉशिंग्टन सुंदरला स्लोअर बॉल खेळताना अडचण येत होत. त्यामुळे फलंदाजाचं शॉट्स सिलेक्शन चुकलं असंच म्हणावं लागेल.
टॉप ऑर्डर फेल : पाऊस येण्यापूर्वी भारतीय फलंदाज धावा काढण्यात अपयशी ठरेल. आघाडीचे फलंदाज चेंडूचा सामना करताना अडखळत होते. विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुबमन गिल 25 धावा असताना तंबूत परतले. 50 धावांपर्यंत भारताने 4 गडी गमावले.
कुलदीप यादवला प्लेइंग 11 मधून डावललं: भारताने या सामन्या अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची फिरकी गोलंदाज म्हणून निवड केली. कारण दोघेही फलंदाजी करतात. पण ही खेळपट्टी चायनामन कुलदीपसाठी चांगली ठरली असती. पटेल आणि सुंदर यांच्या गोलंदाजीचा वेग सारखाच आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सोपं गेलं. तर कुलदीपची गोलंदाजी त्यांना अडचणीची ठरली असती.