मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या विरोधात त्यांनी आता मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर १ नोंव्हेबर रोजी मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज झालेल्या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती देण्यात आली.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, ''निवडणूक आयोग आमचं ऐकत नाही. त्यामुळे आयोगाला दणका देण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही १ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय महामोर्चा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाला मतदानाचा हक्क गमावलेले राज्यातील लाखो लोक येणार आहेत. या मोर्चाद्वारे मतदारांची ताकद आयोगाला दाखवली जाईल'', असंही त्यांनी सांगितलं.
Raj Thackeray : महाराष्ट्रात नवे ९६ लाख खोटे मतदार, आगामी निवडणुकांचा निकाल आधीच ठरलाय; राज ठाकरेंचा खळबळजनक दावामहत्त्वाचे म्हणजे यामोर्चाला विरोधी पक्षातील जवळपास सर्वच नेते उपस्थित असतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. या मोर्चाचं नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते करतील, असं ते म्हणाले. तसेच या मोर्चा महाविकास आघाडीचे सर्वच नेते उपस्थित असतील, अशी माहितीही त्यांनी दिली. देशाच्या लोकशाहीसाठी हा मोर्चा महत्त्वाचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Raj Thackeray: जोशीबुवांनी लक्षात ठेवावं! राज ठाकरे 'त्या' वादग्रस्त विधानावरुन भैय्याजी जोशींवर भडकले, भाजपलाही केला 'हा' सवालदरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मतदार यांद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप सर्वपक्षीय नेते करत आहेत. यासंदर्भात त्यांनी दोन दिवस निवडणूक आयोगाची भेटही घेतली. मात्र, निवडणूक समाधानकारक उत्तर देत नसल्याच आरोप विरोधकांकडून केला जातो आहे. अशातच आता विरोधात निडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय़ घेतला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतही अशाचप्रकारे मोर्चा काढण्यात आला आहोत. तसाच मोर्चा आता मुंबईत निघणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.