सातपूर: त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आयटीआय सिग्नलजवळ शनिवारी (ता. १८) दुपारी दीडच्या सुमारास समीरउला अमनउला या तरुणाने घरगुती वादातून दुचाकी जाळत भररस्त्यावरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार समीरउला हा तरुण घरातील वादामुळे मानसिक तणावाखाली होता. दुपारी दुचाकीवर येत त्याने सिग्नलवर थांबत दुचाकीवर पेट्रोल ओतून ती पेटवली आणि आत्महत्येचा प्रयत्नही केला. दुचाकी पेटताच काही क्षणात मोठा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला.
परिसरात भीषण ज्वाळा आणि धूर पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. तेथून जाणारे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन सिन्हा यांनी प्रसंगावधान राखून धाव घेतली. त्यांनी आणि इतर नागरिकांनी मिळून त्या तरुणाला मागे ओढल्याने त्याचा जीव वाचला.
Satara Crime: 'साताऱ्यात दोन टोळ्यांत राडा; ४० जणांवर गुन्हे'; जुन्या भांडणाच्या वादातून प्रकार; कोयते, दांडकी नाचवत पसरवली दहशतघटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिस आणि अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवत ती पूर्णपणे विझवली. मात्र, दुचाकी पूर्णतः खाक झाली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे.