वडापुरीच्या आकांक्षाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
esakal October 20, 2025 03:45 AM

वडापुरी, ता. १९ : येथील रहिवासी व औराद शहाजानी येथे शिकत असलेल्या मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयातील आकांक्षा जाधव हिने १९ वर्षे वयोगटातील ५० किलो फ्रीस्टाईल राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर व त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुकिंदपुर (ता. नेवासा) यांच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या सहकार्याने १४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत स्पर्धापार पडल्या. आकांक्षा हिला यांना बापू कोळेकर व अमोल थोरवे यांनी मार्गदर्शन केले. क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल यशाबद्दल शार्दो पासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बसवराज वलांडे, सचिव रमेश बगदुरे, उपसचिव पंकज बियाणी, प्राचार्य शिवाजीराव जाधव आदींनी आकांक्षा हिचे अभिनंदन केले. आकांक्षाच्या यशाबद्दल तिचे तालुक्यातून कौतुक होत आहे.

कुस्ती स्पर्धा या फक्त मुलांसाठीच होतात, परंतु माझ्या मुलीला लहानपणापासूनच कुस्ती खेळण्याची आवड होती व ती
लहानपणापासूनच कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. तिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली याचा मला अभिमान आहे.
- सुरेश जाधव, आकांक्षाचे वडील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.