व्यावसायिक गॅस सिलिंडरची चोरी
esakal October 21, 2025 10:45 AM

व्यावसायिक गॅस सिलिंडरची चोरी
तीन वाहनांसह चौघे पोलिसांकडून जेरबंद
नवी मुंबई, ता.२० (वार्ताहर): व्यावसायीक गॅस सिलिंडरमधील गॅसची काळ्या बाजारात विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या चौघांना उरण पोलिसांनी द्रोणागीरी सेक्टर-५० येथे छापा मारुन अटक केली. अनेक महिन्यांपासून गॅस चोरीचा हा धंदा सुरु असल्याचे तपासात आढळून आले.
भारत गॅस एजन्सीमध्ये काम करणारे बालाजी साळवी (४०), मनोहर गोंड (३६), सुरेशकुमार माजरा, (३०) रुस्तुम घरजाळेवर (४९) गॅस सिलिंडरची वितरणाची जबाबदारी होती. चौघेही व्यावसायिक,घरगुती गॅस सिलिंडरमधील २ ते ३ किलो गॅस नोझल पाईपच्या सहाय्याने रिकाम्या सिलेंडरमध्ये भरुन त्याची विक्री करत होते. शनिवारी दुपारी द्रोणागीरी सेक्टर-५० मध्ये चोरीचा हा प्रकार सुरू होता. याची माहिती उरण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनिफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खाडे यांच्या पथकाने ठिकाणी छापा मारला. यावेळी आरोपी व्यवसायिक चोरी करताना रंगेहात सापडले. या कारवाईत ३७५ व्यावसायिक, घरगुती गॅस सिलिंडर त्याचप्रमाणे नोझल पाईप, वजनकाटा असा २४ लाख १२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.