दिवाळी पहाट अभंगवाणीने
दान मागण्यासाठी वासूदेव पनवेलकरांच्या घरी
नवीन पनवेल, ता.२० (बातमीदार)ः हरिनाम बोला... हरिनाम बोला... वासुदेव आला... अन् वासुदेव आला... रामाच्या पहरी वासुदेव आला... दान पावले....! सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांसोबत वासुदेवाच्या अभंगवाणीने पनवेलकरांची पहाट संगीतमय होत आहे.
आळंदी (पुणे) येथील शिवाजी साळुंखे वासुदेव पनवेलच्या परिसरात रामप्रहरी अवतरले. अभंगातील गोडव्याने आनंदमय झाले होते. सुपातून धान्यदान मिळण्याची जागा आता पैशांनी घेतली आहे. पैशांनी वासुदेवाचा खिसा तर भक्कम झाला. पण धान्यासाठीची झोळीत, रिकामी रिकामीच राहिली. धान्याचे दान हे श्रेष्ठदान समजले जाते, पण शहरातील माणसे पैशातच दान मोजण्यात धन्यता मानतात. त्याची परतफेड म्हणून शिवाजी साळुंखे जनजागृती, आरोग्य, नीतिमूल्य, कुटुंबकल्याण अशा प्रकारचे सामाजिक उपदेशात्मक संदेशांतून प्रबोधन करत आहेत.
--------------------
लोकपरंपरा नामषेश होण्याच्या मार्गावर
घरांनाच रामप्रहरी वासुदेव शोभून दिसतो. दान मागण्यासाठी आलेल्या वासुदेवाला पसाभर धान्य मिळायचे. त्या धान्यानेच आपला उदरनिर्वाह भागवायचे असे जीवन वासुदेवाचे. कलियुगात जीवनमान वैज्ञानिक प्रगतीसोबत दळणवळण, लोकसंपर्काची साधने वाढल्याने आधुनिक होत गेली. तसे लोकपरंपरा आता नामषेश होण्याच्या मार्गावर आहे.