तुमच्या आईनेच… ट्रम्प-पुतीन भेटीवर सवाल विचारताच भडकली, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीचं सडेतोड प्रत्युत्तर
GH News October 21, 2025 03:12 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे सतत चर्चेत असतात. त्यांच्याप्रमाणेच व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिलव कॅरोलिन यांनी हफिंग्टन पोस्टच्या रिपोर्टरवर जोरदार हल्ला चढवला . एवढंच नव्हे तर त्याला “डाव्या विचारसरणीचा हॅकर” देखील म्हटलं. कारण काय तर त्या पत्रकाराने त्यांना युक्रेनमधील युद्ध संपवण्याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील आगामी बैठकीबद्दल प्रश्न विचारला होता. लेव्हिट यांच्या विधानामळे नवा वाद निर्माण होऊ शकतो.

काय आहे प्रकरण ?

ट्रम्प यांच्यावरील टीकात्मक कव्हरेजसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ राजकीय पत्रकार एसव्ही डीटीई यांनी लेव्हिटला एक प्रश्न विचारला होता. महत्त्वाच्या शिखर परिषदेसाठी बुडापेस्टमधील कोणी स्थान निवडले ? असा तो सवाल होता. मात्र त्यानंतर हा वाद वाढतच गेला. त्यावर लेव्हिटने अवघ्या एका वाक्यात उत्तरं दिलं, ते म्हणजे “तुमच्या आईने निवडलं आहे.”

नंतर तिने सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिसादाचा स्क्रीनशॉटही शेअर केला. “संदर्भासाठी, हफिंग्टन पोस्टचे एस.व्ही डेट याला तथ्यांमध्ये रस नाही. तो एक डाव्या विचारसरणीचा हॅकर आहे जो वर्षानुवर्षे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पवर सतत हल्ला करतोय. आणि माझ्या फोनवर लोकशाही समर्थक प्रचाराचा भडिमार करत आहे.” असं तिने त्यामध्ये लिहीलं होतं. “डेटच्या फीडवर एक नजर टाका; ते ट्रम्पविरोधी वैयक्तिक डायरीसारखे आहे. खरे पत्रकार असल्याचे भासवणारे कार्यकर्ते या व्यवसायाला कलंक लावतात.” अशी घणाघाती टीकाही तिने केली.

ट्रम्प-पुतीन भेट कधी ?

ट्रम्प-पुतिन यांच्या पूर्वनियोजित शिखर परिषदेची नेमकी तारीख किंवा ठिकाण व्हाईट हाऊसने अद्याप निश्चित केलेले नाही, परंतु पुढील दोन आठवड्यात बुडापेस्टमध्ये ती होण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट रोजी अलास्का येथे झालेल्या त्यांच्या मागील बैठकीमध्ये कोणताही प्रगति झाली नाही आणि ती तशीच संपुष्टात आली. कारण पुतिन यांनी ट्रम्पचा तात्काळ युद्धबंदीचा प्रस्ताव नाकारल्याचे वृत्त होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प यांची भेट घेतलेले युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्यांच्यातील चर्चा सकारात्मक असल्याचे वर्णन केले आणि युक्रेन आता भेटीनंतर 25 पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणालींसाठी कराराची तयारी करत असल्याचे सांगितलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.