PAK vs SA: बाबर आझमला फॉर्म सापडेना! टोनी डी झोर्झीने एका हाताने अफलातून कॅच घेत धाडलं माघारी, पाहा Video
esakal October 21, 2025 11:45 PM
  • पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या खराब फॉर्ममुळे टीकेचा सामना करत आहे.

  • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्याच दिवशी तो स्वस्तात बाद झाला.

  • त्याचा टोनी डी झोर्झीने एका हाताने अफलातून झेल घेतला.

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्याचा हा फॉर्म दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही कायम राहिल्याचे दिसत आहे. त्याला पहिल्या सामन्यातही फार मोठी कामगिरी करता आली नव्हती आता सोमवारपासून (२० ऑक्टोबर) सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीतही तो पहिल्याच दिवशी स्वस्तात बाद झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर सध्या टीका होत आहे.

PAK vs SA 1st Test: बाबर आझमचा अम्पायरने 'करेक्ट कार्यक्रम' केला! पाकिस्तानी चाहते खवळले; १० फलंदाज १६७ धावांत तंबूत परतले

रावळपिंडीमध्ये दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण १३ व्या षटकात इमाम-उक १७ धावांवरच बाद झाला.

मात्र नंतर अब्दुल्ला शफिक आणि कर्णधार शान मसूद यांनी शतकी भागीदारी केली. अब्दुल्ला अर्धशतकानंतर ५७ धावा करून सिमॉन हार्मरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर बाबर आझम कर्णधारा शान मसूदला साथ देण्यासाठी आला होता.

बाबर आझमने सुरुवात चांगली केली होती. त्याच्याविरुद्ध पायचीतच्या अपिलवर डीआरएस रिव्ह्यूमुळे त्याची विकेटही एकदा वाचली होती. पण अखेर केशव महाराजने ५६ व्या षटकात त्याची विकेट घेतली.

झाले असे की केशव महाराज गोलंदाजी करत असलेल्या ५६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाबर आझमने बचावात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण चेंडू त्याच्या बॅटवर लागून उडाला. यावेळी सिली पाँइंटला उभ्या अललेल्या टोनी डी झोर्झीने चपळाई दाखवत लगेचच चेंडू हवेत असताना उजव्या हाताने अफलातून झेल घेतला. त्यामुळे बाबर आझमला २२ चेंडूत १६ धावा करून माघारी परतावे लागले.

बाबर आझमला गेल्या तीन वर्षांपासून शतक करता आलेले नाही. त्याने शेवटचे कसोटी शतक केले, त्याला आता १००० दिवसांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. त्यामुळे आता पुन्हा बाबर आझम अपयशी ठरल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

दरम्यान, बाबर आझम बाद झाल्यानंतर अर्धशतक केलेल्या शान मसूदला सौद शकीलने साथ दिली होती. त्यामुळे पाकिस्तानने २०० धावांचा टप्पा ओलांडला.

AFG vs PAK: पाकड्यांचे शेपूट वाकडे! अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंना मारल्यानंतरही मालिका खेळणवण्यार ठाम; म्हणतात...

मात्र त्यांची रंगत असलेली भागीदारी केशव महाराजनेच तोडली. त्याने शान मसूदला मार्को यान्सिनच्या हातून झेलबाद केले. मसूदने १७६ चेंडूत ८७ धावांची खेळी केली. त्याच्यापाठोपाठ ८५ व्या षटकात मोहम्मद रिझवानला १९ धावांवर कागिसो रबाडाने पायचीत केले. पाकिस्तानने पहिल्या दिवस अखेर ९१ षटकात ५ बाद २५९ धावा केल्या. सौद शकील ४२ धावांवर खेळत आहे, तर सलमान आघा १० धावांवर खेळत आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून सिमॉन हार्मर आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर कागिसो रबाडाने १ विकेट घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.