West Indies created history in the 2nd ODI against Bangladesh : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिज संघाने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. वन डे क्रिकेट स्पर्धेच्या ५४ वर्षांच्या इतिहासात असा पराक्रम करणारा तो पहिलाच संघ ठरला आहे. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २१३ धावा केल्या. पण, या सामन्यात विंडीज संघाने अशी कामगिरी केली, ज्याची इतिहासात नोंद झाली आहे.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघात फिरकीपटूंचा भरणा पाहायला मिळाला. वेस्ट इंडिजच्या संघात फक्त एक जलदगती गोलंदाज होता. वेस्ट इंडिजने अकिल होसेन व गुदाकेश मोती या दोन फिरकीपटूंकडून गोलंदाजीची सुरुवात केली आणि पाचव्या षटकात त्यांना यशही मिळालं. सलामीवीर सैफ हसन ६ धावांवर होसेनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
मोहसिन नक्वी सुधर, नाहीतर...! Asia Cup Trophy वरून बीसीसीआय आक्रमक; पाकिस्तानी नेत्याला दिला इशारा...त्यानंतर मोतीने ११व्या षटकात तोवहिद हृदोयला ( १२) बाद केले. दोन फिरकीपटू चालल्यानंतर विंडीजने एलिक अथानाझेला गोलंदाजीला आणले, तोही फिरकीपटूच... त्याने नजमूल इस्लाम अंकोल ( १५) व महिदूल हसन मिराझ ( १७) यांना बाद केले. बांगलादेशचा निम्मा संघ १०३ धवांत तंबूत परतला होता. यात होसेन व अथानाझे यांच्या प्रत्येकी दोन, तर मोतीच्या एक विकेटचा समावेश होता.
विंडीजकडून रॉस्टन चेस व खरी पिएरे या फिरकीपटूंचा मारा सुरू झाला. मोतीने दुसऱ्या स्पेलमध्ये नसूम अहमद ( १४) व नुरूल हसन ( २३) यांच्या विकेट्स घेतल्या. सौम्या सरकारने सर्वाधिक ४५ धावा केल्या, त्यानंतर ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिशाद होसैनने नाबाद ३९ धावा केल्या. विंडीजने संपूर्ण ५० षटकं ही फिरकीपटूंकडून टाकून घेतली.
Mohammed Shami चा काढला काटा! सातत्याने धावा करणाऱ्या 'मुंबई'च्या खेळाडूकडे आगरकरचं दुर्लक्ष; पुनरागमन झालं अशक्य वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूंची कामगिरी...अकिल होसेन - १०-१-४१-२
रॉस्टन चेस - १०-२-४४-०
खरी पिएरे - १०-०-४३-०
गुदाकेश मोती - १०-०-६५-३
एलिक अथानाझे - १०-३-१४-२
वन डे क्रिकेटमध्ये सर्व ५० षटकं फिरकीपटूंकडून टाकून घेणारा वेस्ट इंडिज आयसीसीचा पूर्ण सदस्य असलेला पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी १९९६ मध्ये श्रीलंकेने वेस्ट इंडिजविरुद्ध फिरकीपटूंकडून ४४ षटकं टाकून घेतली होती. श्रीलंकेने १९९८ ( वि. न्यूझीलंड) आणि २००४ ( वि. ऑस्ट्रेलिया) मध्ये दोन सामन्यांत प्रत्येकी ४४ षटकं फिरकीपटूंना टाकायला लावली होती.