एका सहा वर्षांच्या चिमुकल्याच्या हातात फटाका फुटल्याने तो दृष्टीहीन झाल्याचा प्रकार घडला आहे. सोमवारी बीडमध्ये ही दुर्देवी घटना घडली. त्यानंतर या चिमुकल्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या घटनेनंतर मुलांनी फटके फोडताना काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनातर्फेत करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दिवाळीनिमित्त हा चिमुकला फटाक फोडत होता. त्यावेळी त्याने एक फटाका पेटवला. पण तो न फुटल्याने त्याने तो फटाका हातात घेऊन पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हातात घेताच तो फटाला फुटला, त्यामुळे त्याच्या डोळ्याला इजा झाली. त्यानंतर त्याला तात्काळ बीडमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Beed Viral Video: बीडच्या चौकातच दोन तरूणांचे गट एकमेकांत भिडले, नेमकं काय घडलं? | Sakal Newsयावेळी डॉक्टरांनी त्याला तपासलं मात्र घटनेचं गांभीर्य लक्षात घेता, त्याला खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर बीडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. यावेळी फटाक्यामुळे त्याच्या डोळ्यातील कॉर्निया खराब झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे मुलाला एका डोळ्याची दृष्टी गमावावी लागली.
Beed News : बीडमधील गेवराईत धनगर आरक्षणाचा बळी, एसटी प्रवर्गात समावेश होत नसल्याने मादळमोहीच्या युवकाने घेतला गळफाससध्या मुलीच प्रकृती स्थिर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर आता फटाक्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यावर आता विविध चर्चाही सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुलांनी फटके फोडताना काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनातर्फेत करण्यात आलं आहे.