‘घरडा’मधील विद्यार्थ्यांची
रसायन कंपन्यांमध्ये निवड
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ ः घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठात गुणवत्ता सिद्ध करताना यंदा प्लेसमेंट सत्रात विशेष यश मिळवले. केमिकल विभागातील अनेक विद्यार्थ्यांची निवड नामांकित रसायन कंपन्यांमध्ये झाली आहे. त्यामुळे घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर चमकले आहे.
यंदा जीआयटीच्या केमिकल विभागातील विद्यार्थ्यांचे भारतातील आघाडीच्या कंपन्यांत निवड झाली आहे. हृषिकेश साळुंके, मलिक मुलाणी, अमर पालकर, दूर्वेश पाटील, सुयश राजेशिर्के, विवेक पाटील यांचे घरडा केमिकल्स लोटे, चंदन सकपाळ, सुयश देसाई, अहमद बुरुड, आदित्य सकपाळ, सुजल दळवी, जीवन सागवेकर, चिन्मय जाधव यांचे रोहा डायकेम रोहा, तर वैष्णवी देशमुख महाड येथील लक्ष्मी ऑरगॅनिक्समध्ये, संजना पवार, श्रेयश कोंढाळकर यांचे एबी मौरी लोटे आणि हितेश शेलार, आर्यन मोहिते यांचे विनती ऑरगॅनिक्स लोटे या नामांकित कंपन्यांत निवड झाली. महाविद्यालयाच्या प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभागाने विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नाही तर व्यावसायिक जगतात कसे टिकावे याचेही प्रशिक्षण दिले. महाविद्यालयाचे विश्वस्त, प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील, हेड स्ट्रॅटेजी आणि डेव्हलपमेंट ले. कर्नल रत्नेश सिन्हा, प्रो. संदीप मूनघाटे, समीर ताठरे, केमिकल विभागाचे प्रमुख डॉ. सुनील कुलकर्णी यांच्यासह प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.