मुंबई, पुणे आणि कोल्हापुरातील रहिवाशांसाठी मोठी खुशखबर आहे.. दिवाळीच्या सणाची गडबड सुरू झाली असताना एक सुपर ऑफर मिस करू नका. डीमार्टसारख्या मोठ्या चेन स्टोअरमध्ये २०-३० टक्के सवलत असते, पण स्थानिक बाजारात ४०-५० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळतोय. पारंपरिक वस्तू, मिठाई, कपडे, सजावटीचे सामान आणि दिवाळी फराळ सर्वकाही अर्ध्याही किंमतीत मिळेल.. या छोट्या दुकानदारांनी दिवाळी स्पेशल सेल सुरू केले असून तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व ऑफर्स मिळतील. चला या तीन शहरांच्या हॉटस्पॉट्सचा दौरा करूया आणि डिस्काउंट ऑफर पाहा
मुंबईत क्रॉफर्ड मार्केट
मुंबईत दिवाळीचे किंग मार्केट म्हणजे क्रॉफर्ड मार्केट..या ऐतिहासिक बाजारात ५० वर्षांहून जास्त जुने दुकाने आहेत, जिथे चांदीचे दिवे, रांगोळीचे डिझाईन्स आणि हँडमेड मेणबत्त्या ४० टक्के सवलतीत मिळतायत. डीमार्टमध्ये ब्रँडेड सामान असते, पण इथे लोकल क्राफ्टर्सचे उत्पादन स्वस्त आणि टिकाऊ आहे. बाजारात सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत सुरू आणि पार्किंगची सोयही उपलब्ध आहे.
पुणकरांसाठी तुळशीबाग आणि लक्ष्मी रोड हे दिवाळीचे स्वर्ग.. तुळशीबागेत २०० हून अधिक दुकाने आहेत, जिथे फराळाच्या साहित्यावर ४५ टक्के ऑफ मिळत आहे, जे डीमार्टपेक्षा खूपच स्वस्त आहे. लक्ष्मी रोडवर तर कपडे आणि साड्यांवर ५० टक्के सवलत, प्लस खरेदी करा दोन घ्या एक फ्री स्कीमदेखील मिळेल. स्थानिक व्यापारी संघटनेने हे सेल आयोजित केले असून छोटे व्यावसायिक असल्याने किंमती कमी आहेत आणि ग्राहकांना प्राधान्य दिले जाते.
कोल्हापूरकरांसाठी महाद्वार रोड आणि गांधीनगर हे दिवाळीचे केंद्रबिंदू आहे..महाद्वार रोडवर पारंपरिक मसाल्यांचे पॅकेट्स ३० टक्के स्वस्त,कपडे, दिवाळीचे इतर सामान खूपच स्वस्तात मिळते. डीमार्टच्या १२० पेक्षा कमी. गांधीनगर म्हणल की स्वस्तात मस्त खरेदीचा खजिना..या मार्केटमध्ये सजावटीच्या वस्तू आणि दिवाळी लाइट्सवर ५० टक्के डिस्काउंट मिळत आहे. इथे कोल्हापुरी संस्कृती जपणाऱ्या वस्तू मिळतात आणि दिवाळीमुळे स्पेशल बंडल ऑफर्स देखील दिल्या गेल्या आहेत
त्यामुळे यंदाच्या दिवाळीला या बेस्ट ठिकाणी स्वस्तात मस्त खरेदी करा..पण इथे जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला बारगेन स्किल आलेच पाहिजेत तरच ही खरेदी बेस्ट होईल. तर मग आजच प्लॅन करा कारण सेल संपण्यापूर्वीच स्टॉक संपेल. शुभ दिवाळी..HAPPY DIWALI
FAQsWhat kind of discounts are available in these local markets? / या स्थानिक बाजारात कोणत्या प्रकारच्या सवलती मिळतात?
या बाजारात मिठाई, सजावटीच्या वस्तू, कपडे आणि फराळाच्या साहित्यावर ३० ते ५० टक्के सवलत मिळते.
Which markets in Mumbai are best for Diwali shopping? / मुंबईत डिव्हाळी खरेदीसाठी कोणते बाजार सर्वोत्तम आहेत?
क्रॉफर्ड मार्केट हा डिव्हाळी खरेदीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे, जिथे सर्व वस्तू स्वस्त आणि दर्जेदार मिळतात.
Are there any special offers in Pune’s Tulshibaug and Laxmi Road? / पुण्यातील तुळशीबाग आणि लक्ष्मी रोडवर विशेष ऑफर्स आहेत का?
होय, तुळशीबागेत फराळावर ४५% सवलत आणि लक्ष्मी रोडवर 'दोन खरेदी करा, एक फ्री' ऑफर आहे.
What items are available in Kolhapur’s Mahadwar Road and Gandhinagar markets? / कोल्हापूरच्या महाद्वार रोड आणि गांधीनगर बाजारात कोणत्या वस्तू मिळतात?
मसाले, सजावटीच्या वस्तू, LED लाइट्स आणि कोल्हापुरी हस्तकला उत्पादने स्वस्तात उपलब्ध आहेत.
Are these markets open late during Diwali? / डिव्हाळी दरम्यान हे बाजार उशिरापर्यंत खुले असतात का?
होय, पुणे आणि कोल्हापूरचे बाजार रात्री ९-११ पर्यंत, तर मुंबईचा क्रॉफर्ड मार्केट रात्री १० पर्यंत खुला असतो.