नाशिक: राज्यात विक्री प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ कारसह सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सातपूर पोलिसांनी अशोकनगर येथे कारवाई केली असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या सूचनेप्रमाणे सातपूरच्या अशोकनगर परिसरात सापळा रचण्यात आला होता. शनिवारी (ता. १८) पहाटे दोनच्या सुमारास संशयित स्कॉर्पिओ वाहन अशोकनगर परिसरातील श्रीकृष्ण नगर येथे आले असता, दबा धरून असलेल्या सातपूर पोलिसांनी स्कॉर्पिओला (एमएच ०६ एएन ०७०७) अडविले. तपासणीच्या बहाण्याने वाहनाची तपासणी केली असता, त्यात दडवून ठेवलेला मद्याचा साठा निदर्शनास आला. यात विदेशी मद्याचा साठा होता.
सदरचे मद्य हे महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असताना संशयितांनी या मद्याची तस्करी करीत सातपूरमध्ये विक्रीस आणल्याचे पोलिस तपासातून समोर आले. ५ लाखांच्या स्कॉर्पिओसह विदेशी मद्यसाठा असा ५ लाख ८८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल सातपूर पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास हवालदार खरपडे हे करीत आहेत.
Online Stock Scam : वीस टक्के नफ्याचे आमिष पडले ४५ लाखांना..; ऑनलाइन ॲपच्या नावाखाली भामट्याने केली व्यवस्थापकाची फसवणूकअंडाभुर्जी विक्रेत्यावर गुन्हा
मुंबई नाका येथील खाऊगल्लीत अंडाभुर्जी विक्रेता विनापरवाना देशी दारू विक्री करीत असल्याचे आढळून आले. शांताराम शिवराम जाधव (वय ६५, रा. सिद्धी संकुल अपार्टमेंट, इंदिरानगर) असे संशयित अंडाभूर्जी विक्रेत्याचे नाव आहे. मुंबई नाका परिसरातील संदीप हॉटेलसमोर खाऊगल्ली आहे. याठिकाणी संशयित जाधव याचा अंडाभुर्जीचा गाडा आहे. याठिकाणी तो विनापरवाना देशी दारू विक्री करीत असल्याची खबर मिळताच मुंबई नाका पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला. चारशे रुपयांचा देशी मद्याचा साठाही जप्त केला.