छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका कधी ना कधी प्रेक्षकांचा निरोप घेतात. यातील काही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतात तर काही मालिकांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली असते. कमी टीआरपीमुळे काही मालिका बंद केल्या जातात. गेल्या काही महिन्यात स्टार प्रवाह वाहिनीवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. आता आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. मात्र त्यासाठी स्टारची एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तब्बल ४ वर्षांनी निरोप घेत असल्याने या मालिकेतील कलाकारदेखील भावुक झाले आहेत.
२७ ऑक्टोबरपासून स्टार प्रवाहवर काही मोठे बदल होणार आहेत. या वाहिनीवर ‘काजळमाया’ ही नवीन हॉरर मालिका सुरू होणार आहे. या मालिकेच्या प्रसारणाची वेळ साडेदहा वाजताची आहे. मात्र १०. ३० वाजता 'तू ही रे माझा मितवा' ही मालिका प्रसारीत केली जाते. मात्र ही मालिका आता ८ वाजता प्रसारित होणार आहे. तर ८ वाजता दाखवण्यात येणारी 'कोण होतीस तू कोण झालीस तू' ही मालिका आता ८ ऐवजी रात्री ११ वाजता दाखवण्यात येणार आहे. तर रात्री ११ वाजता दाखवण्यात येणारी 'अबोली' ही मालिका आता बंद होणार आहे.
View this post on InstagramA post shared by Star Pravah (@star_pravah)
'काजळमाया' या हॉरर मालिकेसाठी तब्बल २ मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. ही यश-कावेरीची मालिका रात्री ११ वाजता प्रक्षेपित केली जाईल. ४ वर्षांनंतर 'अबोली' ही मालिका बंद होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं. त्यानिमित्ताने या मालिकेच्या कलाकारांनी Wrap Up पार्टी देखील केली. 'अबोली' या मालिकेत अबोली-अंकुशची लव्हस्टोरी आणि अबोलीचा लढा पाहायला मिळाला. २६ ऑक्टोबर रात्री ११ वाजता अबोली-अंकुशच्या मालिकेचा अंतिम भाग प्रसारित होऊन या सिरियलचा शेवट होणार आहे. आता शेवटच्या भागात अबोली प्रतापरावंचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे.
रात्री उशिराच्या स्लॉटला सुद्धा ‘अबोली’ मालिकेला खूप चांगला टीआरपी मिळत होता. यामध्ये गौरी कुलकर्णी आणि सचित पाटील यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता 'काजळमाया' आणि 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.
आणि असरानी यांची ती शेवटची इच्छा अधुरीच राहिली; चाहतेही हळहळले