पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात केशव महाराजच्या फिरकीने पाकिस्तानी फलंदाजांना अडचणीत आणले.
महाराजने ७ विकेट्स घेत पाकिस्तानचा पहिला डाव ३३३ धावांवर संपवला.
सौद शकीलने अर्धशतक केले, परंतु शेवटच्या ५ विकेट्स पाकिस्तानने फक्त १७ धावांत गमावल्या.
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात रावळपिंडीमध्ये सोमवारपासून (२० ऑक्टोबर) दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात पाकिस्तानी फलंदाजांनी चांगल्या सुरुवातीनंतरही शेवटी गंटागळ्या खाल्ल्याचे दिसले. केशव महाराजच्या फिरकी गोलंदाजीसमोर पाकिस्तानी संघाचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. केशव महाराजने एकट्यानेच ७ विकेट्स घेतल्या.
PAK vs SA: बाबर आझमला फॉर्म सापडेना! टोनी डी झोर्झीने एका हाताने अफलातून कॅच घेत धाडलं माघारी, पाहा Videoया सामन्यात दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने ९२ षटकापासून आणि ५ बाद २५९ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. सौद शकील आणि सलमान आघा नाबाद होते. यांनी दुसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली केली होती. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला लवकर विकेट मिळू दिली नव्हती. अर्धशतकी भागीदारी पूर्ण करून ते दोघे पुढे खेळत होते.
या दरम्यान शकीलने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. पण अखेर १०६ व्या षटकात सलामन आघाला केशल महाराजने ४५ धावांवर पायचीत पकडले आणि इथूनच पाकिस्तानच्या फलंदाजीची गळती सुरू झाली. सलामान आघाची विकेट गेली तेव्हा पाकिस्तानच्या ३१६ धावा झाल्या होत्या.
त्याच्या विकेटनंतर पुढच्या ७ षटकात केशव महाराजने पाकिस्तानच्या सर्व विकेट्स घेतल्या. या ७ षटकात पाकिस्तानला फक्त १७ धावा जोडता आल्या. म्हणजे पाकिस्तानने शेवटच्या पाच विकेट्स केवळ १७ धावांत गमावल्या.
सलमानंतर शकिलला ६६ धावांवर महाराजने बाद केले. त्यानंतर त्याने शाहिन आफ्रिदी (०), साजिद खान (५) आणि असिफ आफ्रिदी (४) या तिघांनाही टिकू दिलं नाही. त्यामुळे पाकिस्तानचा पहिला डाव ११३.४ षटकात ३३३ धावांवर संपुष्टात आला.
या डावात पाकिस्तानकडून पहिल्या दिवशी कर्णधार शान मसूदने ८७ धावांची खेळी केली होती. तसेच अब्दुल्ला शफिकने ५७ धावांची खेळी केली होती. तसेच इमाम-उल-हक (१७), बाबर आझम (१६) आणि मोहम्मद रिझवान (१९) स्वस्तात बाद झाले होते.
AUS vs IND: रोहित शर्मा नितीश रेड्डीला वनडे पदार्पणाची कॅप देताना नेमकं काय म्हणाला होता? BCCI ने शेअर केलाय Videoया डावात दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने ४२.४ षटकात १०२ धावा खर्च करत ७ विकेच्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेकडून केवळ हार्मरने सर्वाधिक २५ षटके गोलंदाजी केली. त्याने ७५ धावा खर्च करत २ विकेट्स घेतल्या. कागिसो रबाडाने १८ षटकात ६० धावा खर्च करत १ विकेट घेतली.