Bollywood News: प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचा निधनाने संपुर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली. पाच दिवसापूर्वीच पंकज धीर यांचं निधन झालं होतं. त्यात आता असरानी गेल्यानं सिनेसृष्टीला धक्का बसलाय. 20 ऑक्टोंबर रोजी असरानी यांचं निधन झालं. लगेच त्याच दिवशी त्यांच्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु एवढ्या घाईघाईने त्यांच्यांवर अंत्यविधी का करण्यात आले? तर असरानी यांच्या मॅनेजरनेच याबाबत खुलासा केलाय.
नवभारत टाईम्सशी बोलताना असरानी यांचे मॅनेजर बाबूभाई थीबा म्हणाले की, '१५ ते २० दिवसापासून असरानी आजारी होते. त्यांना अशक्तपणा जाणवत होता. तसंच गेल्या काही दिवसापासून त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. दरम्यान अचानक त्यांची तब्येत घालावली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.'
पुढे बोलताना मॅनेजर म्हणाले की, 'त्यांना १५ ते २० दिवसांपासून अशक्तपणा जाणवत होता. काही दिवसापूर्वी त्यांना त्रास होऊ लागला. असरानी यांच्या आतड्यामध्ये पाणी जमा झालं होतं. 20 ऑक्टोंबर रोजी दुपारी ३, ३.३० वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. लगेच ८ वाजता त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.' याबाबत बोलताना मॅनेजर म्हणाले की, 'मला त्यांच्या पत्नीने सांगितलं की, त्यांची इच्छा होती की, कोणालाही न कळता सगळं शांतीत व्हावं. त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.'
असरानी यांचा १ जानेवारी १९४१ जन्म झाला. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास ४०० पेक्षा अधिक चित्रपटात काम केलंय. त्यांच्या शोले चित्रपटातील जेलर वालं पात्र प्रेक्षकांच्या मनात आजही कायम आहे. त्यांच्या जाण्याने अनेक चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलय. सिनेसृष्टीतून त्यांच्यावर श्रद्धांजली वाहण्यात आले.
'माझ्यात जी चमक आहे ती तमन्नामध्ये नाही' राखी सावंत तमन्नाबद्दल बोलताना म्हणाली...'आमच्या आयटम सॉन्गमध्ये घुसली आणि...'