IPL 2026 team strategy and transfers: दोन वर्षापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya ) आपल्या ताफ्यात घेत इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासातील सर्वात मोठी ट्रेड केली होती. आता ते पुन्हा एकदा माजी खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी जोर लावत आहेत. मुंबई इंडियन्सला मागील काही पर्वात खास कामगिरी करता आलेली नाही आणि त्यांना मेगा लिलावातही अपेक्षित खेळाडू घेता आले नव्हते, परंतु आता त्यांनी IPL 2026 पूर्वी संघबांधणीसाठी रणनीती आखायला सुरूवात केली आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma) चं वय पाहता, त्याच्यासाठी बॅक अप प्लान तयार करणे, हाही मुंबई इंडियन्सच्या रणनीतीचा भाग आहे. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा संघातील माजी सलामीवीर इशान किशन ( Ishan Kishan) याच्याकडे वळवला आहे.
आयपीएल २०२५ च्या ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैदराबादने ११ कोटी मोजून यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनला आपल्या ताफ्यात घेतले. तो आयपीएल २०१८ ते २०२४ या कालावधीत मुंबई इंडियन्सचा सदस्य होता. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार MI ने इशानसाठी SRH सोबत ट्रेडसाठी चर्चा सुरू केली आहे, परंतु अद्याप काही निर्णय झालेला नाही. मुंबईसह कोलकाता नाइट रायडर्स व राजस्थान रॉयल्स हेही संघ इशानला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक आहेत.
IND vs AUS 2nd ODI : रोहित, विराट यांना शेवटची संधी? जाणून घ्या भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्याची वेळ, ठिकाण अन् Live कुठे पाहालSRH ने २०१९ मध्ये शिखर धवनला रिलीज केल्यानंतर ते इशानला त्यांच्या पसंतीचा खेळाडू ट्रेडमध्ये मिळाल्यास रिलीज करू शकतात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या SRH ला मागील पर्वात साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. इशानने त्या पर्वात शतकाने सुरुवात केली होती, वरंतु त्यानंतर त्याचा सूर गेला तो गेलाच... त्याने संपूर्ण पर्वात ३५४ धावा केल्या आणि त्याला शतकानंतर केवळ एकच अर्धशतक झळकावता आले.
इशान किशनने २०१६ मध्ये गुजरात लायन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. २०१८ मध्ये त्याला ६.२ कोटींत मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात घेतले. त्या पर्वात त्याने २७५ धावा केल्या आणि २०१९ मध्ये त्याला फक्त १०१ धावा करता आल्या. पण, २०२० मध्ये त्याने दमदार खेळ करताना ५१६ धावा कुटल्या आणि त्या जोरावर त्याला भारताच्या ट्वेंटी-२० संघात स्थान मिळाले. २०२१ मध्ये त्याची कामगिरी खराब झाली आणि तो MI च्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर गेला.
IND vs AUS 2nd ODI: रोहित निघून जाताच, गंभीर- आगरकरची Yashasvi Jaiswal सोबत चर्चा; उद्या खेळणार का? कोच म्हणाले...मुंबईने २०२२ मध्ये त्याला १५.२५ कोटींत पुन्हा करारबद्ध केले. पण, २०२४ मध्ये रिलीज केले. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये त्यांनी ३.२० कोटींपर्यंत इशानसाठी बोली लावली, परंतु नंतर माघार घेतली.