ICC latest Test bowler ranking news: पाकिस्तानचा फिरकीपटू नोमान अली ( Noman Ali) याने भारताचा सुपरस्टार जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याचं टेंशन वाढवलं आहे. ताज्या जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत नोमान अली हा नंबर १ च्या दिशेने खूप पुढे आला आहे आणि त्याने जसप्रीतच्या क्रमवारीला आव्हान दिले आहे. सध्या भारतीय गोलंदाज नंबर वन कसोटी गोलंदाज आहे. आयसीसीने ताजी क्रमवारी बुधवारी जाहीर केली.
नोमान अलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत १० विकेट्स घेतल्या होत्या आणि पाकिस्तानने ही कसोटी ९३ धावांनी जिंकली होती. नोमानने या कामगिरीसह चार स्थानांची झेप घेतली आणि तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग पॉईंट्स ८५३ झाले असून तो जसप्रीतपेक्षा ( ८८२) फक्त २९ रेटिंग पॉईंट्सने मागे आहे. नोमानसह पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीनेही कसोटी क्रमवारीत सुधारणा करताना १९वे स्थान पटकावले आहे. त्याने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या.
PAK vs SA 2nd Test: तरुणांनी माती खाल्ली, तिथे 'वयस्कर' खेळाडूने पाकिस्तानची लाज वाचवली! मोडला ९२ वर्षांपूर्वीचा विक्रम, पण...भारताने मोहम्मद सिराज ( १२), कुलदीप यादव ( १४) व रवींद्र जडेजा ( १८) हे गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल २० मध्ये आहेत. न्यूझीलंडचा मॅट हेन्री, ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स व दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा हे अव्वल पाचमध्ये आहेत. रबाडाची तीन स्थानांनी घसरण झाली. पाकिस्तानचे फलंदाज मोहम्मद रिझवान ( १६), बाबर आझम ( २२) व सलमान आघा ( ३० ) यांनीही आपापल्या क्रमवारीत किंचित सुधारण केली आहे.
इंग्लंडचा जो रूट ९०८ रेटिंग पॉईंटसह फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. टॉप १० मध्ये यशस्वी जैस्वाल ( ५) व रिषभ पंत ( ८) हे दोन भारतीय फलंदाज आहेत. शुभमन गिल एक स्थानाच्या सुधारणेसह १२व्या क्रमांकावर आला आहे.
IND vs AUS 2nd ODI: रोहित निघून जाताच, गंभीर- आगरकरची Yashasvi Jaiswal सोबत चर्चा; उद्या खेळणार का? कोच म्हणाले...वन डे क्रमवारीतही बदल पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे सामन्यात भारतावर विजय मिलवला आणि दुसरीकडे इंग्लंडने ट्वेंटी-२०त न्यूझीलंडवर मात केली. मिचेल मार्श दोन स्थानांच्या सुधारणेसह ४२ व्या क्रमांकावर आला आहे. गोलंदाजीत जॉश हेझलवूड १०व्या व मिचेर मार्श २१ व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. भारताचा मोहम्मद सिराज हा १७व्या क्रमांकावर आला आहे. बांगलादेशचे मेहिदी हसन १८व्या क्रमांकावर आहे.