मराठी अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे गेले काही महिने चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत. सुयश आणि आयुषी यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चा होत्या. त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसलं असल्याचं बोललं जातंय. आता पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं दिसतंय. त्याचं कारण ठरतंय सुयश आणि आयुषी यांचे दिवाळी फोटो. या दिवाळी फोटोंमध्ये सुयश आणि आयुषी या दोघांनीही वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत.
सुयश आणि आयुषी यांनी ७ जुलै २०२१ रोजी साखरपुडा केला होता. त्यानंतर २१ ऑक्टोबर २०२१ रोजी ते दोघे लग्नबंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेले. त्यानंतर त्यांनी काही महिने एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले. मात्र काही महिन्यातच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं गेलं. ते दोघेही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करायचे बंद झाले. सुयशने काही महिन्यांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करत सिंगल असल्याचं म्हटलं होतं. तेव्हापासूनच सुयश आणि आयुषीच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात होतं. आता ऐन दिवाळीतही ते दोघे एकत्र दिसलेले नाहीत.
View this post on InstagramA post shared by Suyash Tilak (@suyashtlk)
आयुषी आणि सुयश यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचे फोटो शेअर केले आहेत. मात्र ते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी साजरी करत असल्याचं दिसतंय. ते दोघेही एकमेकांच्या फोटोंमधून गायब आहेत. सुयशने त्याच्या अकाऊंटवरुन लक्ष्मीपूजनाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो त्याच्या आईवडिलांसोबत दिसत आहे. मात्र या फोटोंमध्ये आयुषी दिसत नाहीये. तर आयुषीनेदेखील सोशल मीडियावर दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. ती तिच्या मित्र मैत्रिणींसोबत दिवाळी साजरी करताना दिसतेय.
View this post on InstagramA post shared by Aayushi Bhave (@aayushitlk)
सुयश आणि आयुषी यांच्यात बिनसलं असल्याच्या चर्चांना तेव्हा उधाण आलं जेव्हा त्यांनी सोशल मीडियावरील एकमेकांसोबतचे लग्नासोबत सर्व फोटोही हटवले. त्यामुळे ते दोघे वेगळे झाल्याचे बोलले जात आहे. मात्र दोघांनीही अद्याप याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही.
किती गोड! दीपिकानंतर 'ठरलं तर मग'मधील अस्मिताने दाखवला लेकीचा चेहरा; म्हणते, 'दिवाळी पाडव्याला आम्ही...'