Buffaloes Behind Yamaha : रंगवलेली शिंगे, गळ्यात बांधलेली घुंगरं, मण्यांची झुल व फुलांचा हार घालून सजविलेल्या म्हशींचा रोड शो आज (ता. २२) संपन्न झाला. शहरातील पंचगंगा नदी घाट, कसबा बावड्यातील भाजी मार्केट व गवळी गल्लीत म्हशी पळवण्याचा थरारक अनुभव पहायला मिळतो. दिवाळी पाडव्याला म्हशींना सजवून त्यांचा रोड शो करण्याची परंपरा आजही जोपासली गेली आहे.
शेती व त्यावर आधारित दूध हा पूरक व्यवसाय केला जातो. शिवाजी पेठ, उत्तरेश्वर पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, कसबा बावडा व शहरालगतच्या उपनगरांत शेकडो म्हैस मालक आहेत. त्यांच्याकडून म्हशींना सजवले जाते . त्याची तयारी सकाळपासून करण्यात आली होती.
म्हशींना अंघोळ घालून त्यांच्या शिंगांना तेल लावून पॉलिश करून, त्यावर रिबिन, झुल, कवड्यांच्या पट्ट्या गुंडाळल्या होत्या. फुलांचा हार गळ्यात घालून शिंगावर मोरपिसे बांधली होती. दुपारी तीननंतर नदी घाटावर हलगी, घुमकं, कैताळच्या ठेक्यावर म्हशींना आणले जाणार आहे.
Kolhapur Jilha Bank : परराज्यांतील म्हैस खरेदीसाठी ‘केडीसीसी’ची नवी योजनाView this post on InstagramA post shared by Sandeep Shirguppe (@sandeepshirguppe)
तर कसबा बावड्यात मार्केटमध्ये सकाळी १० वाजल्यापासूनच दुचाकीमागे म्हशी धावताना पहायला मिळाल्या. यामाहाच्या ठेक्यावर म्हशी पळण्याचा थरार डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. तर काहीजण कॅमेरे लावून बसलेले पहायला मिळतात...