पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असताना कार खरेदी करणाऱ्यांना अशा कार हव्या असतात ज्या स्वस्तही असतात आणि मायलेज देखील चांगले देतात. १० लाख रुपयांच्या किंमतीत त्यामुळे हॅचबॅक कार भारतात खूप विकल्या जातात. या कार चालवायला सोप्या असतातच शिवाय मायलेज देखील जास्त देतात. खास करुन सीएनजी व्हेरिएंट असेल तर एकदा टँक भरला की महिनाभर ( सामान्य उपयोगात ) चिंता नको !
विशेष काय – मारुती सुझुकी सेलेरिओ ही कार तिच्या दमदार फ्युअल एफिशिएन्सी साठी ओळखली जाते. ARAI च्या अनुसार या कारचा AMT व्हेरिएंट सुमारे 27 किमी /लिटरचा मायलेज देऊ शकतो.
किंमत किती – मारुती सुझुकी सेलेरिओची सुरुवातीची किंमत 5.50 लाख रुपयांच्या आसपास आहे.
विशेष काय – टॉल-बॉय डिझाईनची ही वॅगनआर कार तिच्या शानदार स्पेस आणि चांगल्या मायलेजसाठी प्रसिद्ध आहे. ही कार पेट्रोलमध्ये सुमारे 25 किमी / लिटर आणि सीएनजी व्हेरिएंटमध्ये 34 किमी / किलोग्रॅम पर्यंतचा शानदार मायलेज देते.
किंमत किती – सुरुवातीची किंमत 4.99 लाखाच्या आसपास आहे.
विशेष काय – ही मारुती सुझुकीची प्रिमियम हॅचबॅक कार आहे. जी स्टाईल आणि एफिशियन्सीचे चांगले कॉम्बिनेशन आहे. बलेनोचे सीएनजी मॉडेल सुमारे 30.61 किमी/किलोग्रॅमचे मायलेज देते. त्यामुळे या प्रिमियम सेगमेंटमध्ये या कारला मायलेजचा राजा बनवते.
किंमत: सुरुवातीची किंमत 5.99 लाखांच्या जवळपास आहे.
विशेष काय : टियागोला GNCAP ने 4-स्टार सेफ्टी रेटिंग दिलेली आहे. जी याला या सेगमेंटमध्ये सर्वात सुरक्षित कार म्हणून दर्जा बहाल करते. हीचा CNG व्हेरिएंट सुमारे 26.40 किमी/किलोग्रॅमपर्यंतचा मायलेज देतो.
किंमत: सुरुवातीची किंमत 4.57 लाख रुपयांच्या आसपास आहे.
विशेष काय : अल्ट्रोझ एक आणखी सुरक्षित (GNCAP 5-स्टार) प्रीमियम हॅचबॅक कार आहे. जी सीएनजी आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्यायांमध्ये मिळते. सीएनजी सुमारे 28 किमी/किलोग्रॅमचा मायलेज देतो.
किंमत: सुरुवातीची किंमत 6.30 लाखांच्या आसपास आहे.