जगभरात असे अनेक देश आहेत, जे सध्या घटत असलेला जन्मदर आणि वाढलेल्या मृत्यूदरामुळे चिंतेत आहेत. जसं की इटलीने नुकतीच एक स्कीम सुरू केली आहे, ज्यामध्ये असे अनेक गावं आहेत, ज्या गावांमध्ये राहण्यासाठी तेथील सरकारकडून लोकांना घर आणि पैसे दिले जात आहेत. तर असे देखील काही देश आहेत, ज्या देशांची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात कमी झाल्यानं तिथे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही, त्यामुळे असे देश दुसऱ्या देशातील लोकांना आपल्या देशात येण्यासाठी प्रोत्साहीत करत असून, त्यांना सर्व सोई -सुविधा मोफत पुरवल्या जात आहेत, आता एका उद्योजकानं अशीच एक नवी स्कीम सुरू केली आहे.
व्लादिस्लाव ग्रोखोव्स्की हे पोलंडचे एक प्रसिद्ध उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक आहेत, देशभरातली अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये त्यांचे हॉटेल आहेत. पोलंडची लोकसंख्या झपाट्यानं कमी होत आहे, यावर चिंता व्यक्त करताना त्यांनी आता एक नवी स्कीम सुरू केली आहे. मुलं जन्माला घालावीत यासाठी ते कपल्सला प्रोत्साहन देत आहेत, त्यांनी त्यासाठी एक खास योजना सुरू केली आहे.
नेमकी काय आहे ही स्कीम
व्लादिस्लाव ग्रोखोव्स्की हे एक प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आहेत, Arche Group नावाने त्यांचा हॉटेल बिझनेस आहे, त्यांच्या ग्रुप अंतर्गत देशभरातील 23 अलिशान हॉटेलचा समावेश होतो. ग्रोखोव्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या हॉटेलमध्ये स्टे दरम्यान जर एखादं कपल प्रेग्रेंट झालं, तर त्यासाठी हॉटेलच्या वतीनं फ्रीमध्ये सेलीब्रेशन पार्टी करण्यात येईल, एवढंच नाही तर जर एखाद्या ग्राहकाने किंवा त्यांच्या स्टाफने त्यांची एखादी प्रॉपर्टी खरेदी केली, आणि प्रॉपर्टी खरेदी केल्याच्या पाच वर्षांच्या आत जर मुलाला जन्म दिला तर अशा कपल्सला तब्बल 10,000 ज़्लॉटी म्हणजे दोन लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे.
पोलंडमध्ये बर्थ रेट खूप कमी झाला आहे, बर्थ रेट वाढवण्यासाठी या उद्योजकानं ही घोषणा केली आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये असताना जर एखाद्या महिलेनं मुलाला जन्म दिला तर त्या मुलांच्या नावानं हॉटेलच्या वतीनं एक झाड लावण्यात येणार आहे. एवढंच नाही तर या हॉटेलमध्ये स्टे दरम्यान जर एखादी महिला गर्भवती राहिली तर हॉटेलच्या वतीनं या कपल्सला खास वेलकम पॅकेज सह एक बेबी स्ट्रोलर देखील फ्रीमध्ये देण्यात येणार आहे, तसेच हॉटेलच्या वतीनं फ्री सेलीब्रेशन पार्टी देखील देण्यात येणार आहे.